पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी शरद मैंद चौथ्यांदा बिनविरोध

By admin | Published: June 29, 2017 12:13 AM2017-06-29T00:13:24+5:302017-06-29T00:13:24+5:30

पुसद अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शरद आप्पाराव मैंद यांची चौथ्यांदा बुधवारी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.

Sharad Maand elected Pushaal Urban Bank president unanimously | पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी शरद मैंद चौथ्यांदा बिनविरोध

पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी शरद मैंद चौथ्यांदा बिनविरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पुसद अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शरद आप्पाराव मैंद यांची चौथ्यांदा बुधवारी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
पुसद अर्बन बँकेच्या संचालकांची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानंतर बुधवारी अध्यक्षपदासाठी जिल्हा उपनिबंधक गौतम वैर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यात विद्यमान अध्यक्ष शरद मैंद यांच्याच सक्षम नेतृत्वावर विश्वास दाखवित संचालकांनी बँकेची धुरा पुन्हा त्यांच्याच खांद्यावर देण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यानंतर पुसदचे आमदार मनोहरराव नाईक स्वत: शुभेच्छा देण्यासाठी बँकेत पोहोचले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
शरद मैंद यांची कामगिरी
पुसद अर्बन बँकेच्या ठेवी आज १५ वर्षानंतर एक हजार कोटीवर गेल्या आहे. ६०० कोटी एवढे कर्जवाटप व स्वनिधी ८१ कोटी तर नफा पाच कोटी आहे. सभासदांना नऊ टक्के डिव्हीडंड वाटप करण्यात येतो. राज्यात बँकेच्या ३६ शाखा आहेत. अर्बन बँकिंग क्षेत्रात सर्वप्रथम पुसद अर्बन बँकेने एटीएम सेवा सुरू केली. बँकेच्या प्रगतीत गेल्या १५ वर्षात सर्व संचालकांनी सहकार्य दिले. तसेच पुसद अर्बन बँकेने योग शिबिर स्वच्छ भारत अभियानांतर्गत डस्टबिनचे वाटप कुपोषित बालकांना दत्तक घेवून त्यांची तपासणी, औषध व संगोपन असे सामाजिक उपक्रमही राबविले. टंचाईच्या काळात १६ ठिकाणी पाच ते दहा हजार लिटरच्या टाक्या बसवून रोज एक लाख लिटर पाणी वाटप केले. वृक्षारोपणासह मागील वर्षी बिझनेस एक्सपो घेण्यात आला. सहा सिकलसेल रुग्णांना बँकेने दत्तक घेतले आहे. जलसंधारण कार्यशाळा घेतली. शहरात रेन हार्वेस्टिंग अभियान राबवून १५ कोटी लिटर पाणी संचय करण्यात आला. गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली.

यापुढे बँकिंग क्षेत्रात स्पर्धा ‘टफ’ - शरद मैंद
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद मैंद म्हणाले, अर्बन बँकिंग क्षेत्रात मोबाईल बँकिंग सेवा सुरू करणारी पुसद अर्बन को-आॅपरेटीव्ह बँक ही विदर्भ, मराठवाडा विभागात पहिली बँक आहे. तसेच डिजिटल बँकिंगमध्ये पुसद अर्बन बँकेचा अ‍ॅग्रेसिव्ह सहभाग आहे. आगामी पाच वर्ष बँकिंग इंडस्ट्रीजमध्ये टफ कॉम्पिटेशन राहणार आहे.
११ जानेवारी १९८६ साली पुसद अर्बन बँकेची स्थापना झाली. पूर्वी नाईक बंगल्यातून संचालकांची निवड होत असे. १९९१ साली पहिली निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी अ‍ॅड.आप्पाराव मैंद यांची निवड झाली. त्यांनी दहा वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. २००२ पर्यंत बँकेत राजकारण होते. तेव्हा संचालकांचे सहकार्य अध्यक्षांना पूर्णपणे मिळत नव्हते. अध्यक्षांना तारेवरची कसरत करावी लागत होती. २००२ मध्ये मी अध्यक्षपदाची धुरा घेतली, तेव्हा बँकेची ठेव ८१ कोटी होती. १६ शाखा होत्या. कर्जवाटप ५५ कोटी होते. स्वनिधी आठ कोटी होता. नफा ५० लाख होता.

 

Web Title: Sharad Maand elected Pushaal Urban Bank president unanimously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.