शरद पवार आज यवतमाळात
By admin | Published: September 22, 2015 03:36 AM2015-09-22T03:36:50+5:302015-09-22T03:36:50+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री यवतमाळात दाखल होत आहेत.
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री यवतमाळात दाखल होत आहेत. बुधवारी ते जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या घरी भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.
मंगळवारी रात्री ९ वाजता शरद पवार यांचे यवतमाळात नागपूरवरुन आगमन होणार आहे. शासकीय विश्राम भवनात त्यांचा मुक्काम राहील. बुधवार २३ सप्टेंबरला सकाळी ९.४५ वाजता ते यवतमाळ तालुक्यातील पिंपरी बुटी या गावाला भेट देतील. याच गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुक्काम केला होता, हे विशेष. पिंपरीमध्ये शरद पवार हे शांताबाई प्रल्हाद ताजने या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करतील. ११.१५ वाजता ते भांबराजा येथे युवराज बनकर, १२.१५ वाजता बोथबोडन येथे आनंद राठोड या शेतकरी कुटुंबांची भेट घेणार आहे. दुपारी २.३० वाजता यवतमाळात त्यांची पत्रपरिषद होईल. त्यानंतर ३.१५ वाजता ते नागपूरला रवाना होतील. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय दिलासा मिळतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.