तीक्ष्ण शस्त्राने तरुणाचा झोपेतच खून
By admin | Published: June 14, 2014 02:32 AM2014-06-14T02:32:06+5:302014-06-14T02:32:06+5:30
घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून केला.
शिबला : घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून केला. ही घटना झरी तालुक्यातील पाचपोहोर येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या
सुमारास घडली.
शालिक भीमराव टेकाम (३४) असे मृत तरुणाचे नाव आहे. शालिक गुरुवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे अंगणात एका खाटेवर झोपला. इतर सदस्यही अंगणातच
झोपले होते. रात्री २.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शालिकच्या छातीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. वार होताच शालिक झोपेतून खडबडून जागा झाला. त्याच्या
ओरडण्याने कुटुंबातील इतर सदस्यही जागे झाले. मात्र अज्ञात मारेकरी पळून गेला. गंभीर जखमी शालिकला घेऊन त्याचे कुटुंब शिबला येथे आले. तेथून पांढरकवडा येथे
हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळला नेण्याचा सल्ला दिला. यवतमाळला नेत असताना सायखेडा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नेमका हल्ला कशासाठी करण्यात आला हे मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस
अधिकारी सुनील लोखंडे आणि पाटणचे ठाणेदार मसराम यांनी घटनास्थळाला भेट दिली. (वार्ताहर)