‘त्या’ कास्तकाराला वृद्धाश्रमात आश्रय
By Admin | Published: September 18, 2016 01:33 AM2016-09-18T01:33:48+5:302016-09-18T01:33:48+5:30
निराधार जीवन जगत असलेल्या अनंतराव नामक कास्तकाराला उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमाने आश्रय दिला.
आर्णी : निराधार जीवन जगत असलेल्या अनंतराव नामक कास्तकाराला उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमाने आश्रय दिला. ‘लोकमत’ने या वृद्धाची व्यथा उजेडात आणल्यानंतर यवतमाळ वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन त्यांची व्यवस्था करून दिली.
शनिवारी दुपारी संत दोला महाराज वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे यांनी त्या शेतकऱ्याला सन्मानाने स्वीकारले. या भावस्पर्शी सोहळ्याला यवतमाळ जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण, वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुरेश राठी, अॅड. जयंत नंदापुरे आदी उपस्थित होते.
मूळचे उत्तरवाढोणा येथील अनंतराव काही दिवसांपासून यवतमाळात निराधार जीवन जगत होते. शनिवारी वाहतूक पोलिसांनी त्यांना वृद्धाश्रमापर्यंत पोहोचविले. तत्पूर्वी गेले चार दिवस पोलिसांनीच त्यांची संपूर्ण व्यवस्था केली. (तालुका प्रतिनिधी)