यवतमाळात कंगना राणावतच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 09:25 PM2020-09-04T21:25:59+5:302020-09-04T21:26:59+5:30
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी दत्त चौकात घोषणाबाजी करीत कंगणाच्या वक्तव्याचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून अभिनेत्री कंगणा राणावत हिने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी दत्त चौकात घोषणाबाजी करीत कंगणाच्या वक्तव्याचा निषेध केला.
शिवसेनेच्या या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कंगणा राणावतचे चित्र असलेल्या फलकाला चपलेने बदडून व ते फलक पायदळी तुडवून निषेध नोंदविण्यात आला. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य केल्यावरूनही कंगणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेतील शिवसेना गट नेते श्रीधर मोहोड, महिला आघाडीच्या निर्मला विणकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. सहसंपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, तालुका प्रमुख संजय रंगे, पिंटू बांगर, अतुल कुमटकर, कल्पना दरवई, ज्योती चिखलकर, गार्गी गिरडकर, विद्या सोमदे, संगीता बागडे, अर्चना भगत आदी सहभागी होते.