यवतमाळ जिल्ह्यात शिवसैनिकाने स्वत:लाच केले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 03:22 PM2019-11-23T15:22:01+5:302019-11-23T15:22:22+5:30
राज्यात शनिवारी सकाळी सरकार स्थापन झाल्यानंतर उमरी (ता.मानोरा) येथील एका शिवसैनिकाने दिग्रस येथे स्वत:च्या हातावर चिरे मारून जखमा करून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात शनिवारी सकाळी सरकार स्थापन झाल्यानंतर उमरी (ता.मानोरा) येथील एका शिवसैनिकाने दिग्रस येथे स्वत:च्या हातावर चिरे मारून जखमा करून घेतल्या.
दिग्रस येथे शनिवारी आठवडीबाजार भरतो. बाजारासाठी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील उमरी येथील एक शिवसैनिक आला होता. तत्पूर्वी सकाळी राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी झाला होता. या सत्ता स्थापनेने या शिवसैनिकाला धक्काच बसला. त्याने मानोरा चौकात काँग्रेसवर आगपाखड केली. त्यानंतर शिवाजी चौकात येऊन काँग्रेसने सरकार स्थापण्याबत गद्दारी केल्याचा आरोप करून स्वत:च्या हातावर चिरे मारले. तेथे उभ्या असलेल्या एका पोलिसाने त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रथमोपचारानंतर त्या शिवसैनिकाला सुटी देण्यात आली. या घटनेने शहरात एकच चर्चा सुरू होती.