शिवसेनेकडून पेट्रोल दरवाढ आणि दानवेंचा निषेध, मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 13:41 IST2020-12-12T13:41:21+5:302020-12-12T13:41:44+5:30
दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या मोर्चाचे कनेक्शन ना. रावसाहेब दानवे यांनी थेट चीन-पाकिस्तानसोबत जोडले होते. या वक्तव्याचा सेनेने निषेध केला

शिवसेनेकडून पेट्रोल दरवाढ आणि दानवेंचा निषेध, मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी
यवतमाळ : केंद्रीय मंत्री, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्याविरोधात केलेले वक्तव्य आणि पेट्राेल-डिझेल दरवाढीच्या मुद्यावरुन यवतमाळ येथी दत्त चाैकात शिवसेनेच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजीही केली.
दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या मोर्चाचे कनेक्शन ना. रावसाहेब दानवे यांनी थेट चीन-पाकिस्तानसोबत जोडले होते. या वक्तव्याचा सेनेने निषेध केला. यावेळी दानवेंच्या फलकास क्राॅस करण्यात आले. तसेच पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल दरात कमी होऊनही पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने निषेध नोंदविण्यात आला. पेट्रोल-डिझेल दरवाढीत केंद्रातील भाजप सरकारचे अर्थकारण असल्याचा आरोप शिवसेनेने केला, यावेळी नारेबाजी करण्यात आली. आंदोलनामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कायकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.