संपर्क प्रमुखाच्या अटकेने शिवसैनिक संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:59 PM2018-07-31T23:59:36+5:302018-08-01T00:00:25+5:30

विधानसभेच्या यवतमाळ मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केली गेल्याने शिवसैनिक जाम संतापले.

Shiv Sena was angry with the arrest of the head of the contact | संपर्क प्रमुखाच्या अटकेने शिवसैनिक संतापले

संपर्क प्रमुखाच्या अटकेने शिवसैनिक संतापले

Next
ठळक मुद्देभाजपावर रोष : कारागृह परिसरात पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभेच्या यवतमाळ मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केली गेल्याने शिवसैनिक जाम संतापले. भाजपाच्या पालकमंत्र्यांचेच हे कारस्थान असल्याचे सांगत शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात आघाडी उघडली.
कामगार निरीक्षक जगदीश गजानन कडू यांच्या तक्रारीवरून संतोष ढवळे यांच्याविरोधात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे व धमकावणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. ढवळे यांना मंगळवारी दुपारी अटक केली. यावेळी शिवसैनिकांनी शहर ठाण्यात ठिय्या दिला होता. ढवळे यांची पोलिसांनी कोठडी मागितली होती. दरम्यान न्यायालयाने ढवळे यांच्या जामिनावर लगेच निर्णय न दिल्याने त्यांची कारागृहात रवानगी झाली. यावेळी शिवसैनिकांनी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पालकमंत्री मदन येरावार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
पालकमंत्र्यांचे भूमाफिया, मटका बहाद्दरांना पाठबळ : शिवसेना />यवतमाळ : संतोष ढवळेच्या अटकेनंतर सायंकाळी शिवसेनेने पत्रपरिषद घेऊन पालकमंत्री मदन येरावार यांच्यावर बेछुट आरोप केले. पालकमंत्री सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिवसैनिकांना जाणीवपूर्वक लक्ष करीत आहे. त्यांच्या या कामाची पालकमंत्र्यांनी धास्ती घेतली आहे. ढवळे यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यास पालकमंत्र्यांनीच अधिकाऱ्यांना निर्देशित केले, ते भूमाफियांसह विविध क्षेत्रातील माफियांना पाठबळ देतात, आदी आरोपी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी पत्रपरिषदेतून केला. ते म्हणाले, विश्वकर्मा सन्मान योजनेत खºया कामगारांची नोंदणी होत नसून भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच लाभ दिला जात आहे. पालकमंत्र्यांच्या कार्यालयात अर्जाचे गठ्ठे जमा केले जात असून ते कामगार अधिकाºयाकडे पुरविले जातात. यवतमाळ पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता असून जाणीवपूर्वक पालकमंत्री दुजाभाव करीत आहे. यवतमाळ वगळता सर्वच पंचायत समिती कार्यालयात नोंदणीची व्यवस्था आहे. यवतमाळ पंचायत समितीमध्येही नोंदणीकरिता काऊंटर उघडावे, अशी मागणी संतोष ढवळे यांनी कामगार अधिकारी धुर्वे यांच्याकडे केली. दोन ते तीन वेळा सांगूनही धुर्वे नोंदणीसाठी कक्ष देत नव्हते. याचा जाब विचारण्याकरिता सोमवारी दुपारी ढवळे कार्यालयात गेले. तेथे त्यांची कामगार निरीक्षकाशी खडाजंगी झाली. यात कडू यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. या एवढ्या घटनेचे पालकमंत्री मदन येरावार यांनी भांडवल केले. ते अवैध धंदे, माफियांचे पाठीराखे असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, गजानन डोमाळे, संजय रंगे, प्रवीण पांडे, किशोर इंगळे आदी उपस्थित होते.

या घटनेशी माझा संबंध नाही. संतोष ढवळेने माजी सैनिकावर हात उचलणे, चष्मा फोडणे योग्य नाही. ही प्रक्रिया निरंतर असल्याने ४ आॅगस्टनंतरही पंचायत समितीत ती राबविणे शक्य होते. त्यासाठी अशी टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हते.
- मदन येरावार,
पालकमंत्री, यवतमाळ

Web Title: Shiv Sena was angry with the arrest of the head of the contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.