दिग्रस वीज वितरणविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:38+5:302021-07-16T04:28:38+5:30

दिग्रस : शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. आता शिवसेनेने वीज वितरण कंपनीला निवेदन ...

Shiv Sena's Elgar against Digras power distribution | दिग्रस वीज वितरणविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

दिग्रस वीज वितरणविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

Next

दिग्रस : शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. आता शिवसेनेने वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

थोडाही वारा व पाऊस आला की वीज गुल होते. यामुळे नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात रोष व्यक्त होत आहे. वीज वितरण कंपनीचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहेत. नागरिकांना सुरळीत पाणी मिळत नाही. शिवसेनेने वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता आर. एस. बोबडे यांना निवेदन सादर करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणावर विजेचा लपंडाव सुरू आहे. खंडित पुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. दिवसभरात दर ५ मिनिटांनी वारंवार पुरवठा खंडित होत आहे. नागरिकांना मन:स्ताप होत आहे. अनेकदा कमी किंवा जास्त दाबाच्या प्रवाहामुळे कित्येक नागरिकांची विद्युत उपकरणे निकामी होत आहेत. नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यात जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद आहे.

वारंवार विद्युत पुरवठा बंद राहत असल्यामुळे नगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची टाकी भरत नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या विरोधात असंतोष पसरला आहे. वीज वितरण कंपनीने अनियमित विद्युत पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम ठवकर, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, नगरसेवक केतन रत्नपारखी, राहुल देशपांडे, ललित राठोड, सुधीर भोसले, विनायक दुधे व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's Elgar against Digras power distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.