यवतमाळ जिल्ह्यात नेर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:18 PM2018-12-10T14:18:11+5:302018-12-10T14:19:24+5:30

नेर नगरपरिषदेच्या १८ जागांपैकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदी विजय प्राप्त करून शिवसेनेने पालिकेवर भगवा झेंडा फडकाविला आहे.

Shiv Sena's saffron on Ner town council in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात नेर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा

यवतमाळ जिल्ह्यात नेर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा

googlenewsNext
ठळक मुद्देनगराध्यक्षासह बहुमत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मुसंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नेर नगरपरिषदेच्या १८ जागांपैकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदी विजय प्राप्त करून शिवसेनेने पालिकेवर भगवा झेंडा फडकाविला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनेही जोरदार मुसंडी मारल्याने शिवसेनेला गेल्यावेळी पेक्षा दोन जागा कमी मिळाल्या आहेत.
नेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. सोमवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यात शिवसेनेला ९, काँग्रेसला चार, राष्ट्रवादीला तीन तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता पवन जयस्वाल विजयी झाल्या. त्यांना आठ हजार १२१ मते मिळाली. काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. शबाना मिर्झा यांना पाच हजार १२१ मते प्राप्त झाली. जवळपास तीन हजार मतांच्या फरकाने जयस्वाल विजयी झाल्या.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ११ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला केवळ एक तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. अपक्षांनीही दोन जागा पटकाविल्या होत्या. यावेळी शिवसेनेच्या जागा दोनने घटल्या आहे. अपक्षांची संख्या कायम आहे. मात्र काँग्रेसच्या जागांमध्ये तीनची भर पडली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेचा फटका बसला आहे. तथापि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने यावेळी मुसंडी मारत दोन जागा जादा पटकाविल्या आहे.

शिवसेनेने गड राखला
जिल्ह्याचे सहपालकमंत्री व राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील नेर नगरपालिकेत बहुमत प्राप्त करून शिवसेनेने गड कायम राखला आहे. नगरसेवकांच्या नऊ जागांसह नगराध्यक्षपद काबीज करून शिवसेनेने पालिकेवर झेंडा फडकविला आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली होती. मात्र शिवसेनेने त्यावर मात करीत गड कायम राखण्यात यश प्राप्त केले.

Web Title: Shiv Sena's saffron on Ner town council in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.