पुसद येथे शिवजयंती, मराठी राजभाषा दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:36+5:302021-03-01T04:49:36+5:30
प्राचार्य विजय उंचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा.विक्रम ठाकरे, प्रा.गजानन जाधव यांच्या नियोजनातून विविध कार्यक्रम झाले. यात संविधान वाचन, समूह गीतगायन, ...
प्राचार्य विजय उंचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा.विक्रम ठाकरे, प्रा.गजानन जाधव यांच्या नियोजनातून विविध कार्यक्रम झाले. यात संविधान वाचन, समूह गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा, मराठी गुजगोष्टी आदींचा समावेश होता. प्रा.अर्चना पाल, प्रा.योगिता काष्टे, रोहन केवटे, स्वाती सूर्यवंशी उपस्थित होते. शिवाणी राठोड हिने स्वागत गीत सादर केले. अभिषेक चव्हाण यांनी प्रार्थना म्हटली.
प्रा.गजानन जाधव यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषेचे गोडवे गायले. साक्षी गोटे, स्नेहल हनवते, कोमल भिसे, उमेश काळे, कुंदन जाधव, सावन चव्हाण, पायल ढगे, उमेश चंद्रवंशी, रूपेश जाधव, भागवत शिंदे यांनी मराठी भाषेवर विचार केले. कोमल राठोड, स्वाती सूर्यवंशी, प्रगती पैठणकर, श्रीधर सरकुंडे, पूनम वंजारे यांनी गीत गायन केले. संचालन वैष्णवी मगर हिने केले. यावेळी उत्कृष्ट व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.