Shivaji Maharaj: पठ्ठ्यानं घरावरच बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, दररोज करतो शिवपूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 03:55 PM2022-02-18T15:55:36+5:302022-02-18T15:56:44+5:30

आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही

Shivaji Maharaj: A statue of Shivaji Maharaj was placed on the house by Pattha in yawatmaal | Shivaji Maharaj: पठ्ठ्यानं घरावरच बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, दररोज करतो शिवपूजा

Shivaji Maharaj: पठ्ठ्यानं घरावरच बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, दररोज करतो शिवपूजा

googlenewsNext

यवतमाळ - छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी, या उद्देशाने आर्णी येथील एका तरुणाने चक्क आपल्या घरावरच 5 फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. आदर्शवत संकल्पना प्रत्यक्षात आणणार्‍या सचिन भोयर याने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून अनेकांनी त्यांच्या या संकल्पनेचं कौतूक केलं आहे. 

आर्णी येथे सचिन भोयर हे वास्तव्यास असून, लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे विचार त्याने अंगिकारले आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही. घर बांधतेवेळी पाच फुट उंचीचा पुतळाही बसविला. 19 फेब्रुवारीला रयतेच्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. शिवमहोत्सवदेखील साजरा होत आहे. परंतु, सचिन भोयर हा केवळ एकच दिवस नाही तर वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजन करतो. त्यानंतरच आपल्या कार्याला सुरुवात करतो. 

पुतळ्यावरून राज्यात राजकारण होताना दिसते. त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घरीच छत्रपती आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा उभारावा. तरुणाईने छत्रपतींचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा असे, आवाहन सचिन भोयर याने केले आहे.


लहानपणापासून सचिन शिवाजी महाराजांचा भक्त आहे. त्याने आपल्या घरावरच छत्रपतींचा पाच फुटाचा पुतळा बसविला. नित्यनियमाने न चुकता तो पुजन करतो. पुतळ्याची विटंबना होऊ नये, यासाठी त्याने घरीच पुतळा बसविला आहे.
अतुल गुल्हाने, रहिवासी


छत्रपती शिवाजी महाराज अठरापगड जातीचे होते. त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असाच आहे. घरी बसविलेल्या पुतळ्याची रोज पुजन करतो. त्यानंतरच आपल्या कामासाठी बाहेर पडतो. पुतळ्यासाठी वादविवाद न करता प्रत्येकाने आपल्या राजाचा पुतळा घरीच बसवावा.सचिन भोयर,
पुतळा बसविणारा तरुण, आर्णी

शिवाजी महाराजांचा पुतळा घरावर बसविला. पुजनेनंतरच सचिन आपल्या कामाला सुरुवात करतो. पुतळ्यावरून राजकारण न करता आपल्या घरावरच पुतळा बसवावा. तरुणांनी छत्रपतींचा विचाराने मार्गक्रमण करण्याचा संदेश पुतळा उभारून सचिन देत आहे.

सुरेश वडपल्लीवार
स्थानिक रहिवासी, आर्णी

Web Title: Shivaji Maharaj: A statue of Shivaji Maharaj was placed on the house by Pattha in yawatmaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.