भाजपाच्या कारभारावर शिवसेनेने ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:27 PM2018-04-13T23:27:26+5:302018-04-13T23:27:26+5:30

संपूर्ण यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई जितकी नैसर्गिक आहे, तितकीच कृत्रिमही आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शुक्रवारी जलसेवेच्या लोकार्पण प्रसंगी केला.

Shivsena has dragged the BJP over the affairs of the party | भाजपाच्या कारभारावर शिवसेनेने ओढले ताशेरे

भाजपाच्या कारभारावर शिवसेनेने ओढले ताशेरे

Next
ठळक मुद्देशहरातील पाणी टंचाई कृत्रिम : शिवसेनेतर्फे २८ टँकरच्या जलवाहिनी सेवेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई जितकी नैसर्गिक आहे, तितकीच कृत्रिमही आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शुक्रवारी जलसेवेच्या लोकार्पण प्रसंगी केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. तर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या स्वनिधीतून २८ टँकरद्वारे दररोज पाणी पुरविले जाणार आहे, अशी घोषणा करण्यात आली.
शिवाजी मैदानावर शिवसेनेच्या वतीने जलसेवेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, विधानसभा सहसंपर्क प्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, सुजित मुनगीनवार, शहरप्रमुख नितीन बांगर, किशोर इंगळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन राठोड, नगरसेवक गजानन इंगोले, किशोर इंगळे उपस्थित होते.
शिवसैनिकांनी पाणी पुरवठ्यासाठी झोकून काम करावे, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी केले. जिल्हाप्रमुखांनी भाजपाच्या कामकाजाचा खरपूस समाचार घेतला. विरोध करून यवतमाळकरांच्या अडचणी वाढविण्यात आल्याचा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला. तर पाणी प्रश्न पेटण्यामागे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप पराग पिंगळे यांनी केला. विधानसभा सहसंपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी जलसंकट कृत्रिम असल्याचा आरोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पांडे यांनी केले.

‘अमृत’च्या कामात गैरप्रकार
यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी सध्या सुरू असलेले अमृत योजनेचे कामकाज निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला. इतक्या मोठ्या योजनेसाठी प्रभारी अधिकाऱ्यांवर काम दिले. त्यामुळे यामागे नक्कीच संगनमत असावे, असे ते म्हणाले. नगराध्यक्ष कांचनताई चौधरी म्हणाल्या, अमृत योजना केंद्राची आहे. त्यात कोणी एकट्याने श्रेय लाटणे चुकीचे आहे. याचवेळी त्यांनी नगरपरिषदेतील भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाºयांकडून येणाºया अडचणींचाही उल्लेख केला.

Web Title: Shivsena has dragged the BJP over the affairs of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.