पुसद नगर परिषदेतील देयक भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 09:59 PM2019-04-20T21:59:42+5:302019-04-20T22:00:11+5:30

एकाच कामाचे दोनदा देयक काढून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. या प्रकरणी संबंधित तांत्रिक सल्लागार, कंत्राटदाराविरुद्ध शिवसेनेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Shivsena's Elgar Against the payment of corruption in Pusad Nagar Parishad | पुसद नगर परिषदेतील देयक भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

पुसद नगर परिषदेतील देयक भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

googlenewsNext
ठळक मुद्देशहर ठाण्यात तक्रार । कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : एकाच कामाचे दोनदा देयक काढून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. या प्रकरणी संबंधित तांत्रिक सल्लागार, कंत्राटदाराविरुद्ध शिवसेनेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पुसद पालिकेमध्ये खासगी तांत्रिक सल्लागार, कंत्राटदार मो.आवेज मो.इलियास यांनी संगनमताने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एकाच कामाचे दोनदा देयक काढले. यात सुमारे आठ लाख ८४ हजार सहा रुपयांचा अपहार झाला. या प्रकरणी शिवसेनेने नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र अद्यापही त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना देयके काढण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या अपहारासंबंधात वारंवार तक्रार करूनही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे शिवसेनेचे गटनेते अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, संतोष दरणे, विष्णू शिकारे, सीमा महाजन आदींनी गुरुवारी थेट शहर पोलीस ठाणे गाठून ठाणेदारांकडे तक्रार सादर केली.
या तक्रारीत शिवसेना सदस्यांनी पालिकेचे २१ लाख रुपयांचे व्हाऊचर गायब असल्याचा आरोप केला. व्हाऊचर गायब असल्याने यातही आर्थिक अफरातफर झाल्याचे त्यांनी म्हटले. या दोन्ही प्रकरणात चौकशी केल्यास किमान ५० ते ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची अपेक्षाही व्यक्त केली. देयक अदा करणाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेनेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शिवसेनेची वकील सेना व सर्व शिवसेना नगरसेवक न्यायालयात दाद मागणार असल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले.
पालिका प्रशासनाला फोडणार घाम
शिवसेनेने पालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध एल्गार पुकारून गेंड्याची कातडी पांघरून असलेल्या प्रशासनाला घाम फोडण्याचा इशारा दिला. यापूर्वी वकील सेनेने मालमत्ता कराविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. आता भ्रष्टाचाराविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करताना शिवसेना तालुका प्रमुख दीपक काळे, विशाल पेन्शनवार, अजय चिद्दरवार, राजू महाजन, संजयकुमार हनवते, विजय बाबर, सुभाष बाबर, गोलू चापके, संदीप घोंगडे, संदीप लाभशेटवार, अभिषेक दुपारते आदी उपस्थित होते.

Web Title: Shivsena's Elgar Against the payment of corruption in Pusad Nagar Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.