यवतमाळातील हे छायाचित्र कोरोनाआधीचे नाही.. आजचे आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 11:10 AM2020-05-18T11:10:26+5:302020-05-18T11:34:22+5:30

श्रावणबाळ योजनेचे पैसे काढण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या नेर येथील शाखेत नागरिकांनी गर्दी करून रेटारेटी सुरु केली आहे. सोमवारी सकाळपासून बँकेसमोर नागरिक जमा होऊ लागले होते. त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही कोणी त्यांना जुमानत नव्हते.

Shocking! This photo in front of the bank in Yavatmal is not from before Corona .. it is today's .. | यवतमाळातील हे छायाचित्र कोरोनाआधीचे नाही.. आजचे आहे..

यवतमाळातील हे छायाचित्र कोरोनाआधीचे नाही.. आजचे आहे..

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : श्रावणबाळ योजनेचे पैसे काढण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या नेर येथील शाखेत नागरिकांनी गर्दी करून रेटारेटी सुरु केली आहे. सोमवारी सकाळपासून बँकेसमोर नागरिक जमा होऊ लागले होते. त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही कोणी त्यांना जुमानत नव्हते. सॅनिटायझरचा वापर पुरेशा प्रमाणात कोणीही करताना दिसत नव्हते. एकमेकांना खेटून, गर्दीत रेटारेटी करून बँकेतून पैसे काढताना नागरिकांनी कोरोनाबाधेच्या शक्यतेलाही दूर लोटल्याचे दिसत होते.

यवतमाळातील कोरोनाची स्थिती
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये सद्यस्थितीत सात अ‍ॅक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 16 जण भरती आहेत. यात नऊ केसेस प्रिझमटिव्ह असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता 20 नमुने पाठविले आहे. तर महाविद्यालयाला 11 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. यात आठ रिपोर्ट निगेटिव्ह असून तीन रिपोर्टचे अचुक निदान नसल्यामुळे त्यांना तपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1668 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 12 जण तर गृह विलगीकरणात 846 जण आहेत.

Web Title: Shocking! This photo in front of the bank in Yavatmal is not from before Corona .. it is today's ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.