जिल्हा परिषदेच्या १४ विभागप्रमुखांना शोकॉज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:09 PM2018-11-19T22:09:57+5:302018-11-19T22:10:42+5:30

जिल्हा परिषदेच्या १४ विभाग प्रमुखांना सीईओंनी बिरसा मुंडा जयंतीला उपस्थित नसल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Shokoj to 14 divisions of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या १४ विभागप्रमुखांना शोकॉज

जिल्हा परिषदेच्या १४ विभागप्रमुखांना शोकॉज

Next
ठळक मुद्देबिरसा मुंडा जयंतीला बगल देणे भोवले : सीईओंनी मागविले तीन दिवसात उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या १४ विभाग प्रमुखांना सीईओंनी बिरसा मुंडा जयंतीला उपस्थित नसल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शासनाने सर्व महापुरुषांच्या जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्याचे निर्देश निर्गमित केले आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयात विविध महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचाºयांनी उपस्थित राहाणे आवश्यक आहे. मात्र नुकत्याच १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या क्रांतीनायक बिरसा मुंडा जयंतीला अनेक अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचाºयांनी दांडी मारली. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १४ विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी सीईओंना याबाबत अवगत केले. त्यानंतर सीईओंनी या १४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. तीन दिवसात खुलासा सादर न केल्यास महाराष्टÑ नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार कारवाईचा इशारा दिला आहे. आता हे अधिकारी कोणता खुलासा करतात याकडे लक्ष लागले आहे.
इंदिरा गांधी जयंतीकडेही पाठ
दरम्यान, सोमवारी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती होती. या जयंतीलाही काहींनी पाठ दाखविली. विशेष म्हणजे अधिकारी, कर्मचारी राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला अनुपस्थित राहात असल्याबद्दल कांगावा करणारे पदाधिकारीही यावेळी उपस्थित नसल्याचे सांगितले जाते.

Web Title: Shokoj to 14 divisions of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.