महाविद्यालयात युवकावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 05:00 AM2022-06-30T05:00:00+5:302022-06-30T05:00:30+5:30

सचिन हराळ (३२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सचिन हा त्याच्या पत्नीला सोडण्यासाठी गुणवंतराव देशमुख महाविद्यालयात आला होता. सचिन पत्नीला सोडून महाविद्यालयातून बाहेर निघत असतानाच त्याच्या मागावर असलेल्या चौघांनी हल्ला केला. सचिनवर जवळून गोळी झाडण्यात आली. नंतर चाकूने वार करण्यात आले. यात सचिन गंभीर जखमी झाला. तो आरडाओरड करीत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अगदी काही क्षणात हल्लेखोर हल्ला करून पसार झाले.

Shooting at youth in college | महाविद्यालयात युवकावर गोळीबार

महाविद्यालयात युवकावर गोळीबार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात सातत्याने गंभीर घटना घडत आहे. यात उघडपणे अग्नी शस्त्राचा वापर होत आहे. कवडीपूर परिसरातील गुणवंतराव देशमुख महाविद्यालयाच्या आवारात एका तरुणावर चार हल्लेखोरांनी देशी बनावटीच्या पिस्टल मधून गोळीबार केला. इतकेच नव्हे तर त्याच्यावर चाकूने वार केले. ही थरारक घटना बुधवारी दुपारी घडली. 
सचिन हराळ (३२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सचिन हा त्याच्या पत्नीला सोडण्यासाठी गुणवंतराव देशमुख महाविद्यालयात आला होता. सचिन पत्नीला सोडून महाविद्यालयातून बाहेर निघत असतानाच त्याच्या मागावर असलेल्या चौघांनी हल्ला केला. सचिनवर जवळून गोळी झाडण्यात आली. नंतर चाकूने वार करण्यात आले. यात सचिन गंभीर जखमी झाला. तो आरडाओरड करीत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अगदी काही क्षणात हल्लेखोर हल्ला करून पसार झाले. मदत पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोरांनी सचिनला गंभीररीत्या जखमी केले. त्याला तातडीने पुसद ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या थरारक घटनेने पोलीसही हैराण झाले आहे. वसंतनगर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

जखमी सचिनच्याही पार्श्वभूमीची करणार पडताळणी
- सचिन हराळ हा काय करतो, नेमका त्याच्यावर पाळत ठेवून हल्ला कुणी केला या घटनेमागे कोण सूत्रधार आहे, अशा एक ना अनेक प्रश्नांची उकल होणे बाकी आहे. या थरारक घटनेमुळे मात्र पुसद शहरात पोलिसांच्या कार्यप्रणाली बद्दल संताप व्यक्त होत आहे. सातत्याने शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहे. चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचाही तपास पोलिसांना लावता आलेला नाही. यामुळे सचिन हराळ प्रकरणानंतर पोलीस आपल्या कार्यप्रणालीत बदल करतील अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

 

Web Title: Shooting at youth in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.