खरेदीत दलालांचा सुळसुळाट

By admin | Published: January 14, 2015 11:17 PM2015-01-14T23:17:10+5:302015-01-14T23:17:10+5:30

कापूस खरेदीत दलालांचा प्रचंड सुळसुळाट झाल्याने शेतकऱ्यांची नाडवणूक होत आहे. पांढरे सोने असलेला कापूस शेतकऱ्यांसाठी काळा आणि कडू ठरत आहे.

Shopping Brokers Solidarity | खरेदीत दलालांचा सुळसुळाट

खरेदीत दलालांचा सुळसुळाट

Next

शेतकऱ्यांची नाडवणूक : पांढऱ्या सोन्याची काळी कहाणी
वणी : कापूस खरेदीत दलालांचा प्रचंड सुळसुळाट झाल्याने शेतकऱ्यांची नाडवणूक होत आहे. पांढरे सोने असलेला कापूस शेतकऱ्यांसाठी काळा आणि कडू ठरत आहे.
वणीत शासकीयसह खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या दोनही समितीत कापसाची आवक प्रचंड वाढली आहे. परिणामी कापूस खरेदीवर ताण पडत आहे. एकाच दिवशी जवळपास ६00 ते ७00 वाहने, बैलबंड्या कापूस घेऊन येत असल्याने खरेदीसाठी धावाधाव होत आहे. नेमकी हिच संधी साधून काही ‘दलाल’ शेतकऱ्यांची नाडवणूक करीत आहे. शेतकऱ्यांचा कापूस चक्क आपल्या नावे टाकून त्यांची बोळवण करीत आहे. पैशाची आवश्यकता असल्याने शेतकरी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे दलालांचे चांगलेच फावत आहे.
सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू आहे. एका दिवशी जवळपास पाच हजार क्विंटलची कापूस खरेदी करण्याची व्यवस्था आहे. मात्र कापूस मोठ्या प्रमाणात येत असल्याने खरेदीवर विपरीत परिणाम होत आहे. त्याचा लाभ घेत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. सीसीआयतर्फे चार हजार ५0 रूपयांचा हमी दर प्रती क्विंटलला देण्यात येतो. मात्र बाजारातील गर्दी बघून अनेक शेतकरी खासगीत कापूस विकत आहे. यात भाव मात्र कमी मिळतो. खासगी कापूस विक्रीत प्रती क्विंटल जवळपास तीन हजार ९00 रूपयांपासून दर मिळत असल्याची माहिती आहे. अर्थात प्रती क्विंटल १00 ते १२५ रूपयांनी शेतकरी नाडविला जातो. मात्र पैशांची निकड असल्याने शेतकरी खासगी कापूस विक्रीकडे वळत आहेत. त्यातही काही दलाल चक्क शेतकऱ्याचा कापूस आपल्या नावे विकतात, अशी ओरड होत आहे. परिणामी काही दलालांच्या नावे आत्तापर्यंत शेकडो क्विंटल कापूस सीसीआयला विकण्यात आला असण्याची शक्यता बळावली आहे.
कापूस खरेदीत शेतकऱ्यांपेक्षा दलालांचा जादा लाभ मिळत आहे. कापसाच्या पैशातून दलालीही कापली जात आहे. त्यातच काही दलाल शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी ‘साईड’ घेतात. जादा दराचे आमिष दाखवून त्यांच्या कापसाचे पैसे परस्पर उचलतात. पैसेही वापरतात. हा प्रकार खासगी बाजार समितीत सर्रास सुरू असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Shopping Brokers Solidarity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.