दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अल्प दिलासा

By admin | Published: January 23, 2015 12:07 AM2015-01-23T00:07:17+5:302015-01-23T00:07:17+5:30

तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने नऊ कोटी ७७ लाखांची मदत मंजूर केली आहे़ यातील पहिला हप्ता म्हणून सहा कोटी १० लाख रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Shortage of relief to drought-hit farmers | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अल्प दिलासा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अल्प दिलासा

Next

मारेगाव : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने नऊ कोटी ७७ लाखांची मदत मंजूर केली आहे़ यातील पहिला हप्ता म्हणून सहा कोटी १० लाख रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित तीन कोटी ६७ कोटी रूपये लवकरच प्राप्त होणार आहे़
सन २०१४ च्या खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेने अपुरा पाऊस पडला. खंडवृष्टीने तालुक्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ दुबार, तिबार पेरण्या करूनही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुध्दा निघाला नाही़ तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने संपूर्ण तालुका दुष्काळसदृश्य घोषित केला़ या दुष्काळात होरपळलेल्या तालुक्यातील १०८ गावांतील १८ हजार ३६८ शेतकऱ्यांना शासनाकडून विलंबाने का होईना अल्पशी नऊ कोटी ७७ लाखांची मदत घोषित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला़
मंजूर मदतीपैकी पहिला हप्ता म्हणून प्राप्त झालेले सहा कोटी १० लाख रूपये तालुक्यातील ७६ गावांतील ११ हजार ७६४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील प्रशासनामार्फत सुरू आहे़ उर्वरित तीन कोटी ७६ लाख रूपये लवकरच प्राप्त होणार आहे़ ती रक्कम ३२ गावांतील सहा हजार ६०४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे़ ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँक खाते उघडले नसतील, त्यांनी पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत बँक खाते उघडून खाते क्रमांक संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयात बँक पासबुकच्या झेरॉक्ससह द्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ़संतोष यावलीकर यांनी केले आहे़
अत्यल्पभूधारक, अल्पभूधारकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर चार हजार ५०० रूपये, तर बहुभूधारकांना एक हेक्टरसाठी चार हजार ५०० रूपयांची मदत मिळणार आहे़ तालुक्यातील ज्या ७६ गावांतील ११ हजार ७६४ शेतकऱ्यांना प्रथम हप्त्याची सहा कोटी १० लाख देण्यात येणार आहे, त्यात नेत, गौराळा, वरूड, खैरगाव भेदी, वसंतनगर, वागदरा, दुर्गडा, कान्हाळगाव वाई, आवळगाव, सावंगी, धानोरा, लाखापूर, आकापूर, मच्छिंद्रा, खंडणी, मेंडणी, कुंभा खंड १ व २, श्रीरामपूर, इंदिराग्राम, सिंदी, महागाव, रामेधर, टाकळी, मुकटा, कानडा, पार्डी, झगडा, शिवणी, फेफरवाडा, हिवरा, गोरज, चोपण, चनोडा, बांबर्डा, आपटी, दांडगाव, चारगाव, बोरी बु़, कोथुर्ला, मांगली, कृष्णापूर, बडगाव, डोंगरगाव, किन्हाळा, कान्हाळगाव उजाड, तुकापूर, नवरगाव, हिवरी, म्हैसदोडका, रोहपट, पेंढरी, करणवाडी, खडकी, खापरी, हटवांजरी, घनपूर, गोधणी, केगाव, उमरघाट, किलोना, आसन, जगलोन, सराटी, कोलगाव, टाकरखेडा, डोर्ली, वडगाव उजाड, कोसारा, वनोजा, वेगाव, सगनापूर, रामपूर, अर्जुनी या गावांचा समावेश आहे़
तालुक््यातील उर्वरित गावांना दुसरा हप्ता प्राप्त होताच पैशाचे वितरण होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Shortage of relief to drought-hit farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.