शॉर्टहॅन्ड परीक्षेत ‘शॉर्टकट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:04 AM2018-02-06T00:04:10+5:302018-02-06T00:04:28+5:30
लघुलेखन अर्थात शॉर्टहँड परीक्षेत ‘पास’ होण्यासाठी शॉर्टकट मारला जात आहे. काही टायपिंग इंस्टिट्यूटचे संचालक आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू आहे. यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : लघुलेखन अर्थात शॉर्टहँड परीक्षेत ‘पास’ होण्यासाठी शॉर्टकट मारला जात आहे. काही टायपिंग इंस्टिट्यूटचे संचालक आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू आहे. यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. जानेवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतही असा गैरप्रकार झाल्याची तक्रार शासकीय परीक्षा परिषदेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली आहे.
कुठलीही प्रॅक्टीस न करता शॉर्टहँड परीक्षेत पास होण्यासाठी मोठी उलाढाल होते. एका पेपरसाठी तब्बल दहा हजार रुपयांचा व्यवहार केला जातो. परीक्षेपूर्वीच हे सर्व सेटलमेंट केले जाते. परीक्षार्थ्याने काय करायचे, पेपर लिहायचा कुणी हे सर्व ठरविण्यात येते. यात टायपिंग इंस्टिट्यूटच्या संचालकाची महत्त्वाची भूमिका असते. काही टायपिंग इंस्टिट्यूट यासाठी प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. शॉर्टहँड म्हणजे काय, हेही माहीत नसलेले विद्यार्थी परीक्षेत पास होतात.
परीक्षा सुरू असताना टायपिंग इंस्टिट्यूटच्या संचालकांना तसा कक्षात प्रवेश नसतो. पण लघुलेखन परीक्षेकरिता त्यांना मुक्तता असते. शॉर्टहँडचा पेपर आणण्यापाूसन तर पेपर लिहून घेण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते पार पाडून घेतात. पास होण्यासाठी ‘व्यवहार’ झालेल्या विद्यार्थ्यांचे कोरे पेपर बाहेर काढले जातात. विद्यार्थ्याची केवळ परीक्षा केंद्रावर हजेरी असते. काढलेले पेपर तज्ज्ञांकडून लिहून घेतले जातात. काही हुशार विद्यार्थ्यांची मदत यासाठी घेतली जाते. प्रत्येक परीक्षेत होणारा हा प्रकार थांबविण्यासाठी परीक्षा परिषदेने उपाय करावे, अशी पालकांची अपेक्षा आहे. केंद्राधिकाºयांकडे आलेल्या कोºया उत्तरपत्रिकेवर उभ्या आणि तिरप्या रेषा ओढल्यास इतरांना उत्तरे लिहिता येणार नाही. लिहिल्यास तपासताना लक्षात येईल. पुढे होणाºया परीक्षांमध्ये ही दक्षता प्रामाणिकपणे घ्यावी, अशी मागणी आहे.