बेंबळाच्या कामात ‘शॉर्ट’कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:26 AM2018-04-09T00:26:37+5:302018-04-09T00:26:37+5:30
चापडोह, निळोणा आणि गोकीची साथ संपण्यापूर्वी बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी ‘शॉर्ट’कट मारले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चापडोह, निळोणा आणि गोकीची साथ संपण्यापूर्वी बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी ‘शॉर्ट’कट मारले जात आहे. जॅकवेलवर स्लॅबऐवजी बिम टाकून मोटर बसविली जाणार आहे. पाण्याचे शुध्दीकरण निळोणा आणि चापडोहच्या केद्रांवर होणार आहे. याशिवाय आणखी काही तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहे.
यवतमाळ शहराला २४ तास पाण्यासाठी ३०२ कोटींची ‘अमृत’ योजना हाती घेण्यात आली आहे. पाणी टंचाई लक्षात घेता या योजनेचे पाणी शक्य तितक्या लवकर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. सध्या बेंबळा प्रकल्पावर जॅकवेलचा शेवटचा बिम बांधणे सुरू आहे. त्यावर सध्या ५७० एचपीचे दोन पंप बसविले जाणार आहे. यासाठी स्लॅबचे काम थांबविण्यात आले आहे. तातडीची उपाययोजना म्हणून हा प्रयत्न केला जात असल्याचे या विभागाने प्रकल्पाच्या भेटीदरम्यान सांगितले. वीज वितरण कंपनीने १५ एप्रिलपर्यंत वीज पुरवठा देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले.
बेंबळा प्रकल्पातून आणलेले पाणी थेट टाकळीच्या सम्पमध्ये घेतले जाणार आहे. तेथून आठ किमीची पाईपलाईन टाकावी लागणार आहे. तेथून निळोणा येथील शुद्धीकरण केंद्रावर जाईल.
शुध्दीकरण झालेले पाणी परत प्राधिकरणातील टाकीत आणून शहरात वितरित केले जाणार आहे. या सर्व प्रक्रिया होण्यासाठी विलंब लागत असल्याने ‘अमृत’चे पाणी लाबणीवर पडल्याच्या बाबीला प्रत्यक्ष भेटीत दुजोरा मिळाला आहे.