दिग्रसमध्ये तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:17 PM2018-04-21T22:17:19+5:302018-04-21T22:17:19+5:30

उत्तर प्रदेशमधील उन्नाव, जम्मू काश्मीरमधील कठुवा व सूरत येथील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत नागरिकांनी शुक्रवारी येथील तहीलवर धडक दिली.

Shot on tehsil in Digras | दिग्रसमध्ये तहसीलवर धडक

दिग्रसमध्ये तहसीलवर धडक

Next
ठळक मुद्देकठुआ घटना : आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : उत्तर प्रदेशमधील उन्नाव, जम्मू काश्मीरमधील कठुवा व सूरत येथील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत नागरिकांनी शुक्रवारी येथील तहीलवर धडक दिली.
शहरातील जामा मशीद येथून शुक्रवारी दुपारी ३ वाजता विविध फलक व घोषणा देत नागरिकांचा मोर्चा निघाला. हा मोर्चा तहसीलवर धडकताच तेथे नगरसेवक सै. अकरम यांनी मोर्चाला संबोधित करताना भाजपा, आरएसएसवर टीका केली. तिनही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. नंतर तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनातून महिला व मुलींवर अत्याचार करणाºयांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर काझी सैयद अबु जफर, सैयद अकरम सै. उमर, मिर्झा अफजल बेग, समीर मुश्ताक पटेल, अमानखाँ बाबाखां, जावेद खान नवाज खान, जावेद पटेल, सलीम खान गफ्फार खान, आरिफ बाळापुरे, हाजी शौकत अली मलनस, अमोल कनिन्दे, मकसूद शेख, अमिन नौरंगाबादे आदींच्या स्वाक्षºया आहे.

Web Title: Shot on tehsil in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.