लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:21 PM2018-04-29T22:21:41+5:302018-04-29T22:21:41+5:30
रासा येथे रविवारी गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांनी श्रमदानात भाग घेऊन लोकांचा उत्साह वाढविला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत रासा हे गाव सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : रासा येथे रविवारी गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी श्रमदानात भाग घेऊन लोकांचा उत्साह वाढविला.
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत रासा हे गाव सहभागी झाले. जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या गावाने एकजुटीने श्रमदान सुरु केले आहे. एवढेच नाही तर महाश्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करुन मान्यवरांना सहभागी होण्याची विनंती केली. रविवारी या गावात अनेकांनी श्रमदानात आपला खारीचा वाट उचला.
गावकऱ्यांसोबत श्रमदानात आमदार डॉ.अशोक उईके, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, उपनगराध्यक्ष मनोज काळे, प्रा.भैयासाहेब दोंदल, नगरसेवक अब्दुल अजीज, भाजपाचे शहर अध्यक्ष रूपेश राऊत, अशोक उमरतकर, निखिल गोधनकर, अर्पणा सुभेदार, प्रा. रेखा वाट, बसवेश्वर माहुलकर, गिरीश सुभेदार, सुभाष मस्कर, गौरव रामगडे, समीर मस्कर, अशोक बागडे, तौसीफ शेख आदींसह गावकरी सहभागी झाले होते.