श्रीराम फायनान्सच्या अफरातफरीचा तपास जाणार ‘ईओडब्ल्यू’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:11 PM2019-04-30T22:11:53+5:302019-04-30T22:13:07+5:30

येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.मध्ये झालेल्या एक कोटी १६ लाख ३३ हजार १३० रुपयांच्या अफरातफर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सोपविला जाण्याची चिन्हे आहेत.

Shriram Finance's Investigation will be investigated by EOW | श्रीराम फायनान्सच्या अफरातफरीचा तपास जाणार ‘ईओडब्ल्यू’कडे

श्रीराम फायनान्सच्या अफरातफरीचा तपास जाणार ‘ईओडब्ल्यू’कडे

googlenewsNext
ठळक मुद्देएक कोटी १६ लाख : साताराच्या चमूने केले होते आॅडिट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.मध्ये झालेल्या एक कोटी १६ लाख ३३ हजार १३० रुपयांच्या अफरातफर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सोपविला जाण्याची चिन्हे आहेत.
श्रीराम फायनान्समध्ये तेथील कर्मचाऱ्यांनीच एक कोटी १६ लाखांची अफरातफर केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात २७ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. एक कोटी पेक्षा अधिक रकमेचे प्रकरण असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान लेखापरीक्षण झाले असताना हा घोटाळा उघडकीस आला कसा नाही याची चर्चा सध्या आहे. सूत्रानुसार, जानेवारी महिन्यात सातारा येथील आॅडिटर्स चमू येथे येऊन गेली. त्यांनी आॅडिटही केले. या आॅडिटर्सने पॅनलवरील सुवर्णकाराशिवाय आर्णी रोडवरील एका सुवर्णकाराची सोने तपासणी कामी मदत घेतल्याचे सांगितले जाते. या आॅडिटमध्ये ही अफरातफर उघडकीस आली. मात्र त्यावेळी आपलेच कर्मचारी असल्याने तडजोडीचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते. परंतु ‘ठरल्याप्रमाणे’ न वागता या चमूने आपला रिपोर्ट सादर केला. तडजोडही केली आणि रिपोर्टही दिल्याने तेथील यंत्रणेत नाराजी पहायला मिळते. दरम्यान एक कोटी १६ लाखांच्या या अफरातफर प्रकरणात ग्राहकांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे श्रीराम फायनान्सने प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.

Web Title: Shriram Finance's Investigation will be investigated by EOW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.