महामार्गावर दुतर्फा वाढली झुडपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:47 AM2021-08-21T04:47:37+5:302021-08-21T04:47:37+5:30
कव्हरेजअभावी मोबाईलधारक त्रस्त पांढरकवडा : शहरासह तालुक्यातील अनेक गावांत कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. टॉवर ...
कव्हरेजअभावी मोबाईलधारक त्रस्त
पांढरकवडा : शहरासह तालुक्यातील अनेक गावांत कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. टॉवर व भूमिगत लाईनवर लाखो रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी महागडे मोबाईल खरेदी करूनही नेटवर्क राहत नसल्याने मोबाईधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही सेवा सुरळीत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
फवारणीसाठी औषधी उपलब्ध करावी
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या डेंग्यू, मलेरियासह इतर पावसाळी संसर्गजन्य आजराने डोके वर काढले आहे. त्यामुळे गावागावांत फॉगिंग मशीनने फवारणी करण्याची मागणी होत आहे; परंतु या फॉगिंग मशिनने फवारणी करण्याकरिता लागणारे किंग फॉग औषध आरोग्य विभागाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने हे औषध लवकरात लवकर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडले खड्डे
पांढरकवडा : तालुक्यातील बहुतांश मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही चांगलेच वाढत चालले आहे. काही ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर होत असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकाराकडे लक्ष देण्याची व खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.