आजारी आईचा मुलानेच केला खलबत्त्याने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:18 PM2018-09-02T22:18:32+5:302018-09-02T22:19:38+5:30

अर्धांगवायूने दीड वर्षांपासून बिछान्यावर खिळलेल्या वृद्ध आईचा पोटच्या पोरानेच खलबत्त्याने ठेचून खून केला. शहरातील गुरुनानक नगरात रविवारी दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला. घटना प्रत्यक्ष पाहणारी सून ओरडत घराबाहेर पडली.

The sick mother's son crushed the blood | आजारी आईचा मुलानेच केला खलबत्त्याने ठेचून खून

आजारी आईचा मुलानेच केला खलबत्त्याने ठेचून खून

googlenewsNext
ठळक मुद्देदीड वर्षापासून बिछान्यावर : आरोपीला तासाभरात अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अर्धांगवायूने दीड वर्षांपासून बिछान्यावर खिळलेल्या वृद्ध आईचा पोटच्या पोरानेच खलबत्त्याने ठेचून खून केला. शहरातील गुरुनानक नगरात रविवारी दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला. घटना प्रत्यक्ष पाहणारी सून ओरडत घराबाहेर पडली. मात्र मारेकरी मुलगा तंबाखू चोळत निर्विकारपणे घराबाहेर निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अवधूतवाडी पोलिसांनी तासाभरात त्याला जेरबंद केले.
शांताबाई नारायण उईके (६०) रा. गुरूनानकनगर असे मृत महिलेचे नाव आहे. शांताबाई यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा कैलास (३५) विमनस्क आहे. तो फक्त घरी जेवणासाठीच येत होता. रविवारी दुपारी तो घरी आला. जेवण झाल्यावर काही वेळ तो अर्धांगवायूने बिछाण्याला खिळलेल्या आईजवळ बसला. पण अचानक त्याने लोखंडी खलबत्त्याने आईच्या डोक्यावर घाव घातले. यामुळे शांताबाई जागेवरच निपचीत पडली. हा प्रकार पाहणारी घरातील लहान सून चेतना मंगेश उईके (२५) ही आरडाओरड करत घराबाहेर पडली. त्यामुळे परिसरातील नागरिकही घराबाहेर आले. तोपर्यंत आईला ठार करणारा कैलास काहीच झाले नाही, अशा आविर्भावात बाहेर निघून गेला.
या प्रकरणी चेतना उईके यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, अवधूतवाडी ठाण्यातील शोधपथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक मनोज लांडगे आणि ऋतुराज मेडवे यांनी आरोपीला पूनम चौक परिसरातून अटक केली. पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करत आहे.
उईके परिवार हादरला
शांताबाई उईके यांना तीन मुले असून मोठा मुलगा मुंबईत कामाला आहे. दुसरा कैलास आणि तिसरा मंगेश आहे. लहान मुलासोबत उईके दाम्पत्य राहत होते. विनमस्क असलेला कैलास फक्त दोन वेळ घरी जेवणासाठी येत होता. सुरूवातीला काही दिवस त्याने शटर दुुरूस्तीचे काम केले. मात्र त्याचे आजारपण वाढतच गेल्याचे सांगण्यात आले. रविवारी त्याने स्वत:च्याच आईचा प्राण घेतला. या घटनेने संपूर्ण उईके परिवारच हादरलेला आहे.

Web Title: The sick mother's son crushed the blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.