पाटण मार्गावरील साईडपट्ट्याचे काम संथगतीने व निकृष्ट दर्जाचे
By admin | Published: June 25, 2017 12:22 AM2017-06-25T00:22:53+5:302017-06-25T00:22:53+5:30
येथून पाटणकडे जाणाऱ्या पाटण रस्त्याच्या साईडपट्ट्याचे काम संथ गतीने सुरू असून उन्हाळ्यात सुरू झालेले हे काम
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणबोरी : येथून पाटणकडे जाणाऱ्या पाटण रस्त्याच्या साईडपट्ट्याचे काम संथ गतीने सुरू असून उन्हाळ्यात सुरू झालेले हे काम आता पावसाळा सुरू झाला तरी तसेच संथ गतीने सुरू आहे.
पाटण रस्त्याच्या रूंदीकरणाकरिता दोन्ही बाजूने साईडपट्ट्याचे काम सुमारे तीन महिन्यापूर्वी सुरू झाले. आता उन्हाळाही गेला. पावसाळा आला तरीसुद्धा हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यात कामाची क्वालीटी बोगस असून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. मोठी गीट्टी वापरण्यात आली असून त्यात मातीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. आता या मोठ्या गोट्यावर डांबराचा अत्यल्प वापर करण्यात येत आहे. पावसाळ्यात पाण्याने कित्येक ठिकाणची गीट्टी आत्ताच निघत आहे.
विशेष म्हणजे हे काम करताना कामाचे कुठेही फलक लावण्यात आले नाही. तसेच आत्तापर्यंत कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी या कामाची पाहणी केली नाही. सदर कामाची गुणवत्ता क्वालीटी कंट्रोलमार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. हे काम पांढरकवडा येथील एका बड्या कंपनीमार्फत करण्यात येत असल्याचे समजते.