नगराध्यक्षांच्या बंगल्याला पोलिसांचा वेढा

By admin | Published: July 12, 2014 11:54 PM2014-07-12T23:54:26+5:302014-07-12T23:54:26+5:30

अपहरणातील फरार आरोपीच्या शोधात यवतमाळ पोलिसांना अक्षरश: पछाडले आहे. प्रत्येकच संशय आणि टीप तपासून पाहिली जात आहे. याच संशयातून पोलिसांनी काल चक्क येथील मावळत्या

Siege of police in the municipal bungalow | नगराध्यक्षांच्या बंगल्याला पोलिसांचा वेढा

नगराध्यक्षांच्या बंगल्याला पोलिसांचा वेढा

Next

फोन टॅपिंगचा संशय : फरार आरोपीच्या शोधात पोलीस पछाडले
यवतमाळ : अपहरणातील फरार आरोपीच्या शोधात यवतमाळ पोलिसांना अक्षरश: पछाडले आहे. प्रत्येकच संशय आणि टीप तपासून पाहिली जात आहे. याच संशयातून पोलिसांनी काल चक्क येथील मावळत्या नगराध्यक्षांच्या बंगल्यालाच घेराव टाकला होता. परंतु ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशा परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने पोलीस तोंडघशी पडले.
काही दिवसांपूर्वी पिंपळगावातील एका युवकाचे अपहरण झाले. त्याचा अद्यापही थांगपत्ता नाही. परंतु या अपहरणामागे यवतमाळातील एका राजकीय वरदहस्त असलेल्या आरोपीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याला अटक व्हावी म्हणून पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात आहे. या दबावाची सूत्रे थेट चंद्रपूरमधून फिरविली जात आहे. वरिष्ठांकडून दरदिवशी या तपासातील प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. ‘आरोपी सापडत कसा नाही’, अशा प्रश्नांची सरबत्ती होत असल्याने स्थानिक पोलीस अधिकारी अस्वस्थ आहेत. त्यामुळे या आरोपीचा शोध घेण्यासाठी मिळणारी एकही खबर सोडण्याचा धोका पोलीस पत्करताना दिसत नाही. अशातच पोलिसांना शुक्रवारी रात्री टीप मिळाली. चर्च रोडवरील एका बंगल्यात राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असून तो फरार संशयित आरोपी तेथे असल्याचे पोलिसांना सांगितले गेले. सुरुवातीला पोलिसांना त्या बंगल्याची ‘झाडी’ केली असता तेथे काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी उभी दिसली. त्या आरोपीकडेही अशीच गाडी असल्याने आपली टीप बरोबर असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यानंतर अतिरिक्त ताफा बोलावून जणू त्या परिसराला पोलिसांनी वेढा घातला. आरोपीच्या अटकेसाठी पुढे झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तर आपली अग्निशस्त्रेही बाहेर काढली. पोलीस ज्या बंगल्यात शिरले तो बंगला चक्क यवतमाळचे मावळते नगराध्यक्ष योगेश गढिया यांचा निघाला.
प्रत्यक्षात तेथे तो आरोपीही नव्हता आणि ती काळ्या रंगाची गाडी भाजपच्याच एका कार्यकर्त्याची निघाली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच कोंडी झाली. तोंडघशी पडल्याने अखेर पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला. एवढा ताफा नगराध्यक्षही चक्रावून गेले होते. हा सर्व घटनाक्रम पाहता पोलिसांनी नगराध्यक्षांचा फोन तर टॅप केला नाही ना, अशी शंका राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. आरोपीच्या नामसाधर्म्यातून पोलिसांचा हा गोंधळ उडाला. ज्या नावाच्या आरोपीचा पोलिसांना शोध आहे त्याच नावाचा व्यक्ती गढियांकडील बैठकीत हजर असल्याने हा गोंधळ उडाला. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Siege of police in the municipal bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.