१६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:26 PM2018-04-25T21:26:40+5:302018-04-25T21:26:40+5:30

जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित झाले असून महाराष्ट्र दिनी समारंभपूर्वक याचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना राष्ट्रपती पदक मिळाले.

 A sign of 16 police officers and staff | १६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह

१६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह

Next
ठळक मुद्दे१ मे रोजी सन्मान : महासंचालकांचे प्रशस्तिपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित झाले असून महाराष्ट्र दिनी समारंभपूर्वक याचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना राष्ट्रपती पदक मिळाले. त्याबद्दल पोलीस महासंचालकांकडूनही त्यांचा गौरव केला जाणार आहे.
पोलीस दलात सलग १५ वर्षे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची व इतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची या सन्मानचिन्हासाठी निवड केली जाते. पोलीस दलात गौरवाचे असलेले हे सन्मानचिन्ह जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश लक्ष्मणराव इंगळे, राखीव पोलीस उपनिरीक्षक संजीव महादेव नागे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोतीराम पुंडलिकराव राऊत, विलास गोपाळराव मडघे, हरिदास गोविंदराव महल्ले, रविकांत पांडुरंग बदकी, जमादार गजानन कृष्णाजी मडावी, ज्ञानेश्वर नामदेवराव शेंडे, अरुण रामरावजी नाकतोडे, दिलीप कनिराम राठोड, श्यामसुंदर तुळशीराम निंबेकर, सुधाकर गोविंदराव मेश्राम या सहा जणांची निवड झाली आहे. पोलीस नाईक सैयद साजीद सैयद हाशम, संतोष बाबूराव वेट्टी, उमेश रमेशराव गटलेवार या तिघांची महासंचालक सन्मानचिन्हासाठी निवड झाली. या सर्वांना १ मे रोजी सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र पोलीस मुख्यालयातील संचलन मैदानावर आयोजित कार्यक्रमात समारंभपूर्वक दिले जाणार आहे.
एसपींचा गौरव
यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक घोषित झाले आहे. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता या प्रशंसनीय कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना घोषित झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकाचवेळी १६ पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.

Web Title:  A sign of 16 police officers and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस