राष्ट्रवादी महिला आघाडीचे मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:17 PM2018-03-10T23:17:06+5:302018-03-10T23:17:06+5:30

महिलांवर होणारा अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे येथील नेताजी चौकात मूक आंदोलन करण्यात आले.

Silent movement of NCP Women's Front | राष्ट्रवादी महिला आघाडीचे मूक आंदोलन

राष्ट्रवादी महिला आघाडीचे मूक आंदोलन

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : महिलांवर होणारा अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे येथील नेताजी चौकात मूक आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. क्रांती धोटे यांनी नेतृत्त्व केले.
स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अ‍ॅसिड हल्ले, खून, मारहाण, छेडछाड यासारख्या प्रश्नांचा स्त्रियांना सामना करावा लागत आहे. अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी महिलांनी सक्षम व्हावे. सरकार आणि प्रशासनानेही स्त्रियांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या आंदोलनात ज्योती निरपासे, वनमाला अवथळे, ताई बोरखडे, बेबी ठाकरे, अश्विनी टेकाम, वर्षा आखरे यांच्यासह अशोक भोंगे, माधुरी भोंगे, वंदना भोंगे, पुष्पा कराळे, मीरा देशवार, ज्योत्स्ना काथोटे, विमल तलमले, मीना कराळे, सुधाबाई भोयर, पुष्पा लुटे, बेबी नागपुरे, वनिता भोंगे, स्वाती नागपुरे, सुनीता नागपुरे, नीलिमा नागपुरे, रेखा कणसे, आशाबाई महल्ले, प्रभाबाई मरसकोल्हे आदींनी सहभाग नोंदविला.

Web Title: Silent movement of NCP Women's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.