वाहनधारकांकडूनच एकेरीचा फज्जा

By admin | Published: July 17, 2014 12:21 AM2014-07-17T00:21:55+5:302014-07-17T00:21:55+5:30

शहरातील दोन मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आले़ प्राशसनाने हा निर्णय जनतेच्या सुविधेसाठी घेतला़ तथापि अनेक वाहनधारकांना हा निर्णय अद्यापही पचनी पडला नाही. अनेक वाहनधारक एकेरीचे

Single Flea from Vehicle Holders | वाहनधारकांकडूनच एकेरीचा फज्जा

वाहनधारकांकडूनच एकेरीचा फज्जा

Next

वणी : शहरातील दोन मार्ग वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आले़ प्राशसनाने हा निर्णय जनतेच्या सुविधेसाठी घेतला़ तथापि अनेक वाहनधारकांना हा निर्णय अद्यापही पचनी पडला नाही. अनेक वाहनधारक एकेरीचे उल्लंघन करून स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात. संबंधित चौकातील वाहतूक पोलीस दूर उबे राहात असल्यानेही अनेकांना झटका बसत आहे.
शहरातील दोन प्रमुख मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी पोलीस प्रशासनाने घेतला. हा निर्णय निश्चितच पोलिसांच्या स्वार्थासाठी नव्हे, तर शहरातील जनता आणि वाहनधारकांच्या सुविधेसाठीच होता. बेलगाम आणि अस्ताव्यस्त वाहतुकीला लगाम लावून सामान्य जनतेला त्रासमुक्त करण्यासाठी हा निर्णय होता. अनेक अडथळ्यानंतर या निर्णयाला मूर्तरूप प्राप्त झाले होते. त्यानुसार आता या दोनही मार्गाने एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र चौकाचौकात केवळ वाहतूक पोलीस असेपर्यंतच वाहनधारक एकेरीचा अवलंब करताना दिसून येतात. वाहतूक पोलीस तेथे न दिसल्यास अत्यंत सुजाण आणि सुशिक्षित वाहनधारकही बेलगामपणे तेथून आपले वाहन पुढे दामटतात.
जिल्हा वाहतूक शाखेकडून येथील वाहतूक शाखेला चार चौक्या प्राप्त झाल्या आहे. त्या चार ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या चौक्यांमध्ये कधीच वाहतूक पोलीस दिसत नाही. ते दूर कुठेतरी उभे राहतात. त्यामुळे वाहनधारक तेथून सुसाट वेगाने पुढे निघतात. वाहनधारकांना शिस्त न लागल्याने असे प्रसंग वारंवार उद्भवतात. कारण दिवसभर रस्त्यावर पोलिसांचा ताफा ठेवणे पोलीस विभागालाही शक्य नाही़ त्यांना विविध सण, उत्सव, व्हायअपींचे दौरे याकडेही लक्ष द्यावे लागते. त्यामुळे वाहनधारकांनीच आता ही एकेरी वाहतूक आपल्या सुविधेसाठी आहे हे लक्षात घेऊन त्याची अंमलबजवणी करणे गरजेचे आहे. वाहनधारकांना अद्याप शिस्त न लागल्याने अनेकदा पोलिसांसोबत त्यांचे वादही होतात. त्यामुळे वाहनधारकांनीच स्वत:ला शिस्त लावून एकेरीचे पालन करणे आवश्यक आहे. तरच या एकेरी वाहतुकीचा लाभ होणार आहे. वाहनधारकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास शहरात मोजक्याच वाहतूक पोलिसांची गरज भासणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Single Flea from Vehicle Holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.