एकच नारा, तंबाखूमुक्त जिल्हा सारा

By admin | Published: January 1, 2016 03:46 AM2016-01-01T03:46:18+5:302016-01-01T03:46:18+5:30

राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करीत यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तंबाखूमुक्तीचा रथ खऱ्या अर्थाने

A single slogan, a tobacco-free district, Sara | एकच नारा, तंबाखूमुक्त जिल्हा सारा

एकच नारा, तंबाखूमुक्त जिल्हा सारा

Next

संकल्प दिन : १५ हजार मान्यवर, ४५ हजार पालकांसह ४ लाख मुखांतून वदवली शपथ
यवतमाळ : राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करीत यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तंबाखूमुक्तीचा रथ खऱ्या अर्थाने पुढे नेला. गुरूवारी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांत झालेल्या संकल्प दिनात तब्बल ४ लाख ३० हजार नागरिकांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. नव्या वर्षाचे स्वागत करताना शिक्षण विभागाने टाकलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ७ जुलैला राज्य शासनानेही शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेने त्याही पुढे जात शाळांसह संपूर्ण गावच तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर हा ‘तंबाखूमुक्त जीवन संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संकल्प दिन साजरा करण्यात आला. सकाळी ११ ते १२ या एका तासाच्या निश्चित कालावधी मध्ये प्रत्येक ठिकाणी तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली.
गोदणी रोडवरील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा) गुरुवारी सकाळी ११ वाजता संकल्प दिनाचा मुख्य सोहळा झाला. या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अर्थ व बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, समाजकल्याण सभापती लता खांदवे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मीक इंगोले, दीपक पाटील, अवधुत वानखडे, चंद्रमणी घायवटे, सलाम मुंबई फाऊंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अजय पिलाणकर, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते. येथे उपस्थित असलेल्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षांनी तंबाखूमुक्तीची शपथ दिली. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची नोंद लिम्का बुकात होण्याची दाट शक्यता आहे, असे यावेळी सलाम मुंबई फाऊंडेशनचे पिलाणकर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तर सूत्रसंचालन साहेबराव पवार यांनी केले.
जिल्हास्तरावरून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये जवळपास ४ लाख ३० हजार लोकांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. यात १५ हजार मान्यवरांनी तर ४५ हजार पालकांनीही शपथ घेतली. त्यामुळे लिम्का बुकात या उपक्रमाची नोंद होण्याचा मार्ग सुकर झाला आहे, अशी माहिती तंबाखूमुक्ती चळवळीचे जिल्हा समन्वयक अवधुत वानखडे यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)

सर, छातीवर हात ठेवून शपथ घ्या !
४‘‘आता एकच नारा तंबाखूमुक्त जिल्हा सारा’’ असा नारा गावागावांत गुंजला. तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या आग्रहपत्राला प्रतिसाद देत प्रत्येक ठिकाणी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुडाणा, निंभा येथील शाळांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. निंभा येथील शाळेत तंबाखूमुक्ती शपथ घेण्यासाठी सर्वजन जमलेले असताना पन्नाशीतील लक्ष्मण पवार हा ग्रामस्थ धडकला. कोणतेही व्यसन मनाशी संबंधित असते, असे सांगत त्यांनी शिक्षकांना ‘‘सर, तंबाखू सोडण्यासाठी छातीवर हात ठेवून शपथ घ्या’’ अशी सूचना केली. त्यानंतर कार्यक्रमात किंचित बदल करीत हात पुढे करण्याऐवजी हृदयावर ठेवून सर्वांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.

Web Title: A single slogan, a tobacco-free district, Sara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.