दिग्रस शहरात सफाईसाठी सायरन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:52 PM2018-08-24T23:52:49+5:302018-08-24T23:54:44+5:30

सर्वच शहरांमध्ये कचऱ्याची समस्या तीव्र बनली आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा करणेही त्रासदायक ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून आता दिग्रस शहरात घंटागाड्यांऐवजी स्वयंचलित चारचाकी वाहनांचे सायरन वाजणार आहेत.

Sirens for cleaning the city of Digras | दिग्रस शहरात सफाईसाठी सायरन

दिग्रस शहरात सफाईसाठी सायरन

googlenewsNext
ठळक मुद्देघंटागाडीऐवजी चारचाकी वाहने : स्वच्छतेसाठी १७ वाहनांसह जेसीबी खरेदी, दोन कोटी ८८ लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : सर्वच शहरांमध्ये कचऱ्याची समस्या तीव्र बनली आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा करणेही त्रासदायक ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून आता दिग्रस शहरात घंटागाड्यांऐवजी स्वयंचलित चारचाकी वाहनांचे सायरन वाजणार आहेत. नगरपालिकेच्या पुढाकारातून शहर स्वच्छतेसाठी हा नवा प्रयत्न केला जात आहे.
दिग्रस शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचºयाचे व्यवस्थापन किचकट बनत चालले आहे. त्यामुळेच नगरपरिषदेने आता पारंपरिक घंटागाड्यांच्याऐवजी कचरा गोळा करण्यासाठी चारचाकी वाहने वापरण्याचा निर्णय घेतला. घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत दोन कोटी ८८ लाख रुपयांच्या निधीतून नगरपरिषदेने दहा चारचाकी व सात तीनचाकी वाहने तसेच एक जेसीबी खरेदीचा ठराव घेतला आहे. ही सर्व वाहने शहरात फिरून घरोघरचा व नाल्यातून काढलेला कचरा उचलण्यासाठी वापरली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी दिली. दहा नवीन चारचाकी वाहने नुकतीच शहरवासीयांच्या सेवेत दाखल झाली आहे. मुख्याधिकारी शेषराव टाले यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष सदफजहाँ मो. जावेद यांच्या हस्ते वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, नगरसेवक जावेद पहेलवान, केतन रत्नपारखी, कैलास जाधव, किशोर साबू यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
नगरपालिकेत एकमत
नगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये विकास कामांच्या निधीवरून अनेकदा मतभेद होतात. मात्र दिग्रस शहराच्या स्वच्छतेसाठी नवीन वाहन खरेदीच्या ठरावाबाबत प्रशासन आणि पालिका पदाधिकाºयांनी एकमताने पुढाकार घेतला.

Web Title: Sirens for cleaning the city of Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.