उघड्यावर बसले अन् फसले

By admin | Published: January 8, 2016 03:18 AM2016-01-08T03:18:04+5:302016-01-08T03:18:04+5:30

तालुक्यातील मादणी गावात बाभूळगावचे गुड मॉर्निंग पथक धडकताच त्यांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५६ जणांना पकडले.

Sitting on the open and crushing | उघड्यावर बसले अन् फसले

उघड्यावर बसले अन् फसले

Next

५६ जणांवर कारवाई : मादणीतील यादी पोलिसांकडे सादर
बाभूळगाव : तालुक्यातील मादणी गावात बाभूळगावचे गुड मॉर्निंग पथक धडकताच त्यांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५६ जणांना पकडले. या ५६ जणांची यादी पोलीस विभागाला सादर केली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई होण्याचे संकेत आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण बाभूळगाव तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. मिशन यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी २० डिसेंबरला तालुक्यात पदयात्रा काढली होती. शौचालय बांधण्याचा संदेश गावोगावी देण्यात आला. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गाव व पंचायत समितीस्तरावर गुड मॉर्निंग पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाद्वारे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम मादणी गावातून सुरू करण्यात आली. ६ जानेवारीला पंचायत समितीस्तरावरील पथकाने पहाटे ४ वाजता मादणी गावाला अचानक भेट दिली. यावेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५६ लोकांवर कारवाई करण्याबाबतची यादी बाभूळगाव पोलीस ठाण्याला सादर करण्यात आली आहे. मुंबई पोलीस अधिनियम कलम ११५ व ११७ नुसार उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर १२०० रुपये दंड व न्यायालयीन कार्यवाहीची तरतूद आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे धाबे दणाणले असून गावकऱ्यांनी त्वरित शौचालय बांधकाम सुरू करण्याचे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे. गावातील दोन नागरिक नरेंद्र दहीफळे व महादेव मरापे यांनी आपल्या घरी शौचालय बांधकामाचा शुभारंभ उपसरपंच सुनील मते यांच्या हस्ते केला. यावेळी गटविकास अधिकारी राजीव फडके, सहायक गटविकास अधिकारी रमेश दाडके, विस्तार अधिकारी पोपळकर, जारंडे, जांभुळे, टेंभुर्णे, आरोग्यसेवक विजय बुटके, शिक्षक डी.डी. डेबरे, रवी नागरेकर, एल.एच. धुर्वे, अंगणवाडी पर्यवेक्षिका गजबे, केंद्र प्रमुख संजय पोकळे, अंगणवाडी सेविका, आशा बचतगट प्रतिनिधी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

गुड मॉर्निंग पथकाचा दररोज दणका
गुड मॉर्निंग पथक दररोज एक ते दोन गावांमध्ये आकस्मिक भेट देणार आहे. या मोहिमेला पोलीस यंत्रणेचे सहकार्य लाभले आहे. बाभूळगाव तालुक्यातील इतरही गावातील नागरिकांनी उघड्यावर शौचास जावू नये, घरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Sitting on the open and crushing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.