रस्त्यावरील खड्ड्यात बसून ग्रामस्थांचे भजन, भाजयुमोचे अनोखे आंदोलन, पुरड-वेळाबाई रस्त्याची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:52 AM2021-07-07T04:52:04+5:302021-07-07T04:52:04+5:30
पुरड ते वेळाबाई या मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा ...
पुरड ते वेळाबाई या मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. मात्र त्या निवेदनांना कायम दुर्लक्षित करण्यात आले. या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थ अक्षरश: रस्त्यावर उतरले. मागील एक वर्षांपासून कोरोनाचे कारण पुढे करून या मार्गाची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. या आंदोलनात भाजयुमोचे तालुका अध्यक्ष शुभम गोरे, सरपंच विजय ठावरी, भाजयुमो पं.स. सर्कल प्रमुख नीलेश उराडे, वसंता भोस्कर, विकास आसुटकर, भालचंद्र नैताम, सुनील पिदुरकर, विठ्ठल गोरे, अविनाश गेडाम व गावातील नागरिक सहभागी झाले होते.