वणीतील सेतू केंद्रात सावळागोंधळ

By Admin | Published: June 24, 2017 12:42 AM2017-06-24T00:42:19+5:302017-06-24T00:42:19+5:30

दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे.

Slow-colored in Venti Center | वणीतील सेतू केंद्रात सावळागोंधळ

वणीतील सेतू केंद्रात सावळागोंधळ

googlenewsNext

राजस्व अभियानाचा अभाव : निर्धारित वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशासाठी अनेक प्रमाणपत्रांची विद्यार्थ्यांना तातडीने गरज आहे. त्यामुळे येथील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी व पालकांची सध्या गर्दी दिसून येते. परंतु सेतू सुविधा केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने केंद्राचा सावळा गोंधळ विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांची गरज असते. वास्तविक महसूल विभागाने महाराजस्व अभियानाअंतर्गत शाळा महाविद्यालयांमध्ये शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे सहजतेने उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. मात्र अशी शिबिरे घेण्यासाठी महसूल विभागाकडे वेळच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सेतू सुविधा केंद्राची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी सेतू केंद्रावर धडकतात. खासगी सेतू केंद्रामध्ये शुल्क अधिक लागत असल्याने विद्यार्थी व पालक शासकीय सेतू केंद्राकडे धाव घेतात. वणी येथे उपविभागीय कार्यालय असल्याने मारेगाव तहसील कार्यालयातील प्रमाणपत्राचे प्रस्तावही येथे येतात. महसूल विभागाने सेतू केंद्राबाहेर कोणत्या प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतात, प्रमाणपत्राचे शुल्क व प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी दर्शविणारा फलक लावलेला आहे. मात्र या फलकावरील माहितीनुसार कार्यवाही केली जात नाही. खरे पाहता सेतू केंद्रात आता कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही. कोणते कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांची कागदपत्रांची स्कॅनिंग करून त्याला ते परत करावे लागते. तसेच संगणकातून निघणारी पावती त्याला द्यावी लागते. मात्र सेतू केंद्र चालक विद्यार्थ्यांना अर्जाच्या प्रती घेण्यास भाग पाडतात. संगणकाची पावती न देता त्यांना कच्ची पावती दिली जाते. त्यामुळे शुल्काची रक्कम शासनाकडे जमा होते की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
पावतीवर मुदत नसल्याने प्रमाणपत्र कधी मिळणार याचीची शास्वती नसते. जर पावतीवर दिलेल्या मुदतीत प्रमाणपत्र मिळाले नाही तर भरलेला सुविधा आतार परत करावा लागतो. मात्र सेतू केंद्र चालकाकडून विद्यार्थी व पालकांना प्रमाणपत्रासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रमाणपत्रांचे कित्येक प्रस्ताव गहाळ होण्याचे प्रकारही येथील सेतू केंद्रात घडत आहेत.

तहसील परिसरात खासगी अर्जनविसांचा डेरा
नागरिकांना कागदपत्रांचे लिखाण करून देण्यासाठी शासनाने काही अर्जनविसांची नियुक्ती केली आहे. त्यांची नावे फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांना कोणत्या कामासाठी किती शुल्क द्यावे, याचेसुद्धा नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र सेतू केंद्रावरील गर्दीचा फायदा घेऊन तहसील कार्यालय परिसरात अनेक अवैध खासगी अर्जनविसांनी आपला डेरा थाटला आहे. एक टेबल खुर्ची घेऊन मोकळ्या जागेत व रस्त्यावर दुकानदारी सुरू करून या अनधिकृत अर्जनविसांकडून ग्राहक शोधले जात आहे. या खासगी अर्जनविसांवर महसूल विभागाचाही निर्बंध नसल्याने परवानाधारक अर्जविस हैराण झाले आहे. महसूल अधिकाऱ्यांना या अनधिकृत अर्जनविसांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.

 

Web Title: Slow-colored in Venti Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.