जनावरांची तस्करी सुरूच

By admin | Published: March 17, 2016 03:08 AM2016-03-17T03:08:50+5:302016-03-17T03:08:50+5:30

महाराष्ट्रातून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अद्याप जनावरांची तस्करी सुरूच असल्याचे सिद्ध झाले.

Smuggling of animals | जनावरांची तस्करी सुरूच

जनावरांची तस्करी सुरूच

Next

दोन ट्रक ताब्यात : पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्टजवळील घटना
पिंपळखुटी : महाराष्ट्रातून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अद्याप जनावरांची तस्करी सुरूच असल्याचे सिद्ध झाले. मागील सप्ताहात खैरी घाटात ट्रक उलटल्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणात कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा अशीच घटना उघडकीस आली.
ट्रकमध्ये ताडपत्रीने जनावरांना बंद करून वाहनात कोंबून नेत असताना दोन ट्रकला पिंपळखुटी आरटीओ नाक्यावर मध्यरात्री २ वाजता पकडण्यात आले. एम.पी.०९-एच.जी.३४६४ व एम.पी.०४-एच.ई.१६६८ हे दोन ट्रक पिंपळखुटी येथून जात होते. दोन्ही ट्रकने आरटीओ वजन काटा पार केला. नंतर आरटीओ एन्ट्री देण्यासाठी क्लिनर ५०० रूपयांच्या नोटा गडबडीने देत होते. त्यावरून तेथील कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्तव्यावर असलेले आरटीओ पायघन यांनी दोन्ही ट्रकची पाहणी केली, असता त्यात दोन्ही ट्रकमध्ये १०१ जनावरे आढळली.
ट्रकला ताडपत्रीने बंद करून जनावरे कोंबण्यात आली होती. त्यामुळे दोन बैल व दोन गायी मृत्यूमुखी पडल्या. पायघन यांनी लगेच पांढरकवडा पोलिसांना माहिती दिली. बुधवारी पहाटे ठाणेदार गुलाबराव वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांच्यासोबतच घटनास्थळी बजरंग दलाचे काही कार्यकर्ते दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही ट्रक पांढरकवडा ठाण्यात जमा केले. ट्रकममधील गायी व बैल यवतमाळ येथील गोरक्षणाच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

आंध्र प्रदेश, तेलंगणात जनावरांची होतेय निर्यात
आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मोठ्या प्रमाणात राज्यातून जनावरांची निर्यात होते. अनेकदा रात्रीच्या वेळीच विविध वाहनांतून ही जनावरे या दोन्ही राज्यात पोहोचविली जातात. आरटीओ चेकपोस्ट असल्याने अनेकदा जनावरांची वाहतूक करणारे वाहन तावडीत सापडले. त्यामुळे ही वाहने नाका चुकविण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करतात. याच पद्धतीने मागील सप्ताहात एक वाहन खैरी घाटात उलटले होते. त्यात ३८ जनावरांचा मृत्यू झाला होता. दरम्यान याप्रकरणी सय्यद शहा मजिद शहा, सादीरभाई ऊर्फ कल्लाभाई राजा आणि सादीर शेख नसरूद्दीन शेख यांना ताब्यात घेतले.

Web Title: Smuggling of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.