लग्न सोहळ्यातून जोपासली सामाजीक बांधिलकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 07:45 PM2018-05-01T19:45:19+5:302018-05-01T19:45:19+5:30

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असतं. कौटुंबिक आनंदाला उधाण येतं. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाडी मडळीने लेक वाचवा लेक शिकवा चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

Social commitment made by marriage ceremony | लग्न सोहळ्यातून जोपासली सामाजीक बांधिलकी

लग्न सोहळ्यातून जोपासली सामाजीक बांधिलकी

Next

यवतमाळ -  लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असतं. कौटुंबिक आनंदाला उधाण येतं. असाच आनंदोत्सव साजरा होत असताना काळे परिवारातील लग्न सोहळ्यात नवदांपत्यासह वऱ्हाडी मडळीने लेक वाचवा लेक शिकवा चा संकल्प करीत पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

दारव्हा येथील जीवन काळे हा युवक ओम युवा मंच व युवक टिमचा  सक्रिय कार्यकर्ता असून विविध सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असतो. सामाजिक जाणीवेतुन काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास होता. दिनांक ३० एप्रिल रोजी जीवन व राणी विवाह बंधनात अडकले . विवाह सोहळा संस्मरणीय ठरला.सर्व प्रथम म. ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोहळ्या दरम्यान विविध सामाजिक संदेश देणारे फलक लक्ष वेधून घेत होते. लग्न सभागृह जणु वऱ्हाडी मंडळी सोबत सामाजिक विचारांचं आदानप्रदान करीत होतं. स्वच्छ भारत मिशनचा फलक कर्तव्याची जाणीव करून देत होता.लेक वाचावा लेक शिकवा चा सचित्र  संदेश मुलींविषयी आत्मसन्मान जागविणारा ठरला.एवढेच नव्हे तर पारंपारिक मंगलाष्टके आटोपताच नवदांपत्यासह वऱ्हाडी मंडळीने 'लेक वाचावा लेक शिकवा' ही शपथ घेतली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मंच च्या सौ.अर्चनाताई उडाखे यांनी सदर शपथ वदवून घेतली.यावेळी संपूर्ण सभागृह भारावून गेले.उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरात या संकल्पनेचे  स्वागत केले. भोजनस्थळी अन्नाची नासाडी टाळण्याबाबतचा संदेश अंतर्मुख करायला लावणारा होता. भोजनावर मनसोक्त ताव मारल्यानंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पाणी फाऊंडेशनच्या श्रमदान चळवळीत सामील होण्याचे आवाहन करीत पाण्याचे महत्व पटवून दिले. या शिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनम्र अभिवाचन करण्यात आले. सोबतच पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला. 
विशेष म्हणजे नवरी मुलीला निरोप दिल्या नंतर गृहप्रवेशा पूर्वी भुलाई या गावात जावून पानी फाऊंडेशन च्या उपक्रमात जीवन व राणी या  नवदांपत्याने श्रमदान केले. जलचळवळीत सहभागी होवून वेगळा आदर्श निर्माण केला.यावेळी ओम युवा मंच ,युवा टीम,सावित्रीबाई फुले महिला मंडळ हे सहभागी झाले होते.वधु वराचा ग्रामस्थांनी सन्मान केला.

नववधू-वरासह वऱ्हाडी मंडळी ने घेतलेली शपथ

 लेक वाचवा,लेक शिकवा
मी वचन बद्ध आहे.
-  मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यास...
- मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यास ...
- मुलगी म्हणजे परक्याचे धन ही मानसिकता बदलण्यास..
- मुले व मुली समानता करण्यासाठी...
-  बालविवाह व हुंडा पध्दतीचा विरोध करण्यास...
- महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यास..
- प्रसूतीपूर्व गर्भनिदान तपासणीचा विरोध करण्यास ...
- स्त्रीभ्रूण हत्येला विरोध करण्यास...
- मुलींचे संरक्षण करण्यास....
 मी वचन बद्ध आहे.

Web Title: Social commitment made by marriage ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.