सामाजिक न्याय भवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:14 PM2017-12-17T22:14:59+5:302017-12-17T22:16:30+5:30
सामाजिक न्याय भवनाच्या सुंदर इमारतीचे काम राळेगाव येथे नुकतेच पूर्णत्वास आले असून या इमारतीला आता उद्घाटनाच्ांी प्रतीक्षा आहे. ही इमारत अवघ्या दीड वर्षात बांधून पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यशस्वी ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : सामाजिक न्याय भवनाच्या सुंदर इमारतीचे काम राळेगाव येथे नुकतेच पूर्णत्वास आले असून या इमारतीला आता उद्घाटनाच्ांी प्रतीक्षा आहे. ही इमारत अवघ्या दीड वर्षात बांधून पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यशस्वी ठरला आहे. १२५० चौरस फुटाचे बांधकाम तळ मजल्यावर १०० विद्यार्थी एकाचवेळी अध्ययन करू शकणार आहे.
सामाजिक न्याय भवनाची ही इमारत दोनदा वादात अडकली. पहिल्यांदा विरोधी ठेकेदाराने टेंडर प्रकरणात न्यायालयात धाव घेतली होती. ते प्रकरण कसेबसे निपटले. त्यानंतर समाजकल्याण विभागाने दिलेल्या जागेवर बांधकाम विभागाने आखणी करून काम सुरू करताना ती जागा खासगी असल्याचे आढळून आले. त्यानंतर चूक सुधारून विभागाच्याच जागेवर नव्याने आखणी करण्यात येवून काम पूर्णत्वास करण्यात आले.
ही इमारत अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अभियंता लिलाधर वाघमारे, शाखा अभियंता एन.बी. राऊत आदींनी पूर्णत्वास नेली.