दारव्ह्यात सामाजिक संघटनांचा मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:14 PM2018-04-21T22:14:58+5:302018-04-21T22:14:58+5:30
कुठूआसह देशातील विविध घटनांच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांच्यावतीने दारव्हा येथे शनिवारी मूकमोर्चा काढण्यात आला. जम्मुतील चिमुकलीचे हत्याकांड, उत्तर प्रदेशातील उन्नाव हत्याकांड, वर्धा येथील आदिवासी युवतीचे हत्याकांड ....
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : कुठूआसह देशातील विविध घटनांच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांच्यावतीने दारव्हा येथे शनिवारी मूकमोर्चा काढण्यात आला.
जम्मुतील चिमुकलीचे हत्याकांड, उत्तर प्रदेशातील उन्नाव हत्याकांड, वर्धा येथील आदिवासी युवतीचे हत्याकांड तसेच औरंगाबाद येथील आदिवासी मुलीच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ कॉटन मार्केट ते तहसीलपर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसील परिसरात पोहोचल्यानंतर मोचार्चे रूपांतर सभेत झाले. यावेळी भैरव भेंडे, डॉ मनोज राठोड, सार्थक मुधोळकर, डॉ. वासीउल्ला कुरेशी आदींनी विचार व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
संचालन गणेश भोयर, संजय बिहाडे तर आभार अ.समीर, राजेश वानखडे यांनी मानले. मोर्चात माळी महासंघ, बंजारा सेवा संघ, कुणबी मराठा संघ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, चैतन्य ग्रुप, मनसे, भाग्योदय क्लब, गोरसेना, समाजवादी पार्टी, बहुजन मुक्ती मोर्चा, मुस्लिम मेहतर समाज, बुद्ध विहार समिती, प्रहार, राष्ट्रीय एकता परिषद, बिरसा बिग्रेड, भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघ, भारिप-बहुजन महासंघ, मॉर्निंग वॉक ग्रुप, रमाई महिला मंडळ, भीमाई महिला मंडळ, सेवाभाया ट्रस्ट, लिंगायत समाज संघटना, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, शेतकरी संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मंडळ, मोहरम कमिटी, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.