उमरखेडमध्ये सोयाबीनचा उतारा निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 09:54 PM2017-10-02T21:54:22+5:302017-10-02T21:54:45+5:30
दसरा संपताच शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामाला लागले असून, गतवर्षी एकरी १० ते १२ क्विंटल सोयाबीचे उत्पादन झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत आहे.
दिनेश चौतमाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुळावा : दसरा संपताच शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामाला लागले असून, गतवर्षी एकरी १० ते १२ क्विंटल सोयाबीचे उत्पादन झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत आहे. अपुºया पावसाने सोयाबीनचा उतारा निम्म्यावर आला असून, त्यातच मजुरीचे भावही वाढले आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
उमरखेड तालुक्यात यावर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने सोयाबीनची लागवड करण्यात आली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी सोयाबीनच्या वाढीवर त्याचा परिणाम झाला. अनेक शेतकºयांनी ओलित करून सोयाबीन जगविले. तसेच तुषार सिंचनासारख्या पावसावर सोयाबीन वाढले. मात्र, ऐन फुलधारणेच्यावेळी पावसाने दडी मारली. सुमार ४० दिवस पाऊस आल्याने पिकांचा फुलोरा गळून गेला. काही ठिकाणी अळींचा प्रादुर्भाव झाला. त्याचा परिणाम आता उताºयावर होत आहे. गत वर्षी ज्या शेतात १० ते १२ क्विंटल एकरी उतारा येत होता. तेथे यंदा पाच ते सहा क्विंटलच उतारा येत आहे.
गत वर्षी सोयाबीन काढणीचे दर दीड हजार ते १७०० रुपये होते. यावर्षी दोन हजार ते २२०० रुपये दर आहे. त्यातच दुष्काळामुळे मजूर शहरात स्थलांतरित झाले आहे. याचा फायदा घेत मजुरीचे दर वाढत आहे. सध्या शेताशेतात सोयाबीन काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र मजुरीचे दर आणि निम्मा उतारा येत आहे. अशा परिस्थितीत लागवडीचा खर्चही निघण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत अपुºया पावसाने रबी हंगामात गहू, हरभरा घेणेही कठीण झाले असल्याचे दिसत आहे.
बाजारभाव स्थिर
निसर्ग साथ देत नाही अन् बाजारात भाव मिळत नाही यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीनचे बाजारभाव दोन हजार ५०० ते दोन हजार ७०० रुपयांवर स्थिर आहे. एकरी १५ ते १६ हजार रुपये उत्पादन खर्च येतो. सरासरी पाच क्विंटल उत्पादन निघाल्यास जेमतेम उत्पादन आणि खर्च बरोबरीत होतो. शेतकºयांच्या हाती काहीही उरत नाही.