सोयाबीन कुटाराचा धावता ट्रक पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:41 IST2019-04-10T21:40:49+5:302019-04-10T21:41:29+5:30
सोयाबीनचे कुटार घेऊन निघालेला धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी येथे घडली. वीज तारांचा स्पर्श झाल्याने हा प्रकार घडला. बसस्थानकावर असलेल्या लोकांनी ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली.

सोयाबीन कुटाराचा धावता ट्रक पेटला
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगलादेवी : सोयाबीनचे कुटार घेऊन निघालेला धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी येथे घडली. वीज तारांचा स्पर्श झाल्याने हा प्रकार घडला. बसस्थानकावर असलेल्या लोकांनी ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली.
एम.एच.२७/एक्स-७९३२ या क्रमांकाचा ट्रक चिखली (कान्होबा) येथून नेरकडे जात होता. मांगलादेवी बसस्थानकाजवळ या ट्रकमधील कुटाराचा स्पर्श वीज तारांना झाला. या तारांमध्ये घर्षण होऊन ट्रकने पेट घेतला. बसस्थानकावर असलेल्या लोकांनी ही बाब चालक शेख साबीर शेख निजाम (५०) याच्या निदर्शनास आणून दिली. चालकाने समयसूचकता दाखवित पेटता ट्रक मांगुळ रस्त्यावर गावापासून दूर नेला.
या घटनेची माहिती पोलीस पाटील विनोद कापसे यांनी नेर पोलिसांना दिली. ठाणेदार पितांबर जाधव यांनी अग्नीशमन दलाचे वाहन पाठवून आगीवर नियंत्रण मिळविले. सदर ट्रक नेर येथील सलीम खाँ सैफुल्ला खाँ यांच्या मालकीचा आहे.