सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव

By admin | Published: July 17, 2016 12:49 AM2016-07-17T00:49:19+5:302016-07-17T00:49:19+5:30

तालुक्यात सोयाबीनच्या कोवळ््या पिकावर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

Soya bean lava | सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव

सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव

Next

शेतकरी हवालदिल : कृषी विभागाचे फवारणी करण्याचे आवाहन
दारव्हा : तालुक्यात सोयाबीनच्या कोवळ््या पिकावर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळी वातावरण आणि पाच दिवस झालेल्या सततच्या पावसाने पोषक वातावरण तयार झाल्याने कोवळ््या पानांवर अळ््यांनी आपली उपजिविका सुरू केली आहे. परिणामी पानांना छिद्र पडत आहेत.
यावर्षी परिसरात पावसाला लवकरच सुरूवात झाली. तालुक्यात यंदा २३ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सध्या सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. डवरणी, निंदणाचा खर्च परवडत नसल्याने तसेच मजुरांच्या कमतरतेमुळे औषधांव्दारे तणांवर नियंत्रण केले जात आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने तीन दिवसांपूर्वीपासून उघडीप दिली. त्यामुळे तण नियंत्रणासाठी शेतांमध्ये शेतकरी वर्ग फवारणीत व्यस्त आहे. त्यातच वातावरणातील बदलामुळे सोयाबीनच्या पिकावर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळ््यांनी पानाला आपले लक्ष केल्याने पानांचा छिद्र पडत आहे. याचा परिणाम पीक वाढीवर होत आहे. अळ््यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कीडकनाशकाच्या फवारणीची गरज आहे. यासंदर्भात पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, शेतकऱ्यांनी फ्लोरोपायटीफॉस ३० मिली प्रती पंप किंवा क्विनॉलफॉस ३० मिली प्रती पंप या रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी असा सल्ला दिला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Soya bean lava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.