उमरखेड तालुक्यात सोयाबीन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:14 AM2017-09-15T00:14:19+5:302017-09-15T00:14:34+5:30

अपुºया पावसातही वाढलेल्या सोयाबीनला आता शेंगाच लागल्या नसल्याचे वास्तव उमरखेड तालुक्यात दिसत आहे.

Soybean hazard in Umarkhed taluka | उमरखेड तालुक्यात सोयाबीन धोक्यात

उमरखेड तालुक्यात सोयाबीन धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देशेंगाच लागल्या नाही : नुकसानग्रस्त भागाची कृषी तज्ज्ञांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : अपुºया पावसातही वाढलेल्या सोयाबीनला आता शेंगाच लागल्या नसल्याचे वास्तव उमरखेड तालुक्यात दिसत आहे. महागडे बियाणे घेऊनही शेतकºयांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. कृषी संशोधकांनी पाहणी केली असून, शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
उमरखेड तालुक्यातील तिवडी, टाकळी आणि लिंबगव्हाण परिसरात सोयाबीन मोठ्या प्रमाणात वाढून आले असले तरी शेंगा लागल्या नसल्याचे दिसत आहे. अत्यल्प पाऊस व बियाण्यांनी चांगला प्रतिसाद न दिल्याने खरीप हंगामाचे वाटोळे झाले. ३१ आॅगस्ट रोजी कृषी विभागाच्या संशोधक व कृषी अधिकाºयांनी तिवडी, टाकळी आणि लिंबगव्हाण या भागातील सोयाबीनची पाहणी केली. २०१७-१८ मध्ये अनेक शेतकºयांना पीक विमा उतरविता आला नाही. इंटरनेट सेवा कोलमडल्याने ही मंडळी विमा काढण्यापासून वंचित राहिली. त्यांना विम्याच्या लाभात सामावून घ्यावे, अशी मागणी होत आहे. यावेळी श्रीराम नलावडे, अनिल कदम, गंगाधर गंगात्रे, राजेश नलावडे, श्रीराम कदम, विनायक कदम, संजय शिंदे, पंजाबराव नलावडे, संजय नलावडे, ज्ञानेश्वर शिरफुले आदी शेतकरी उपस्थित होते. आता या शेतकºयांना केव्हा मदत मिळणार हे मात्र कुणीही सांगू
शकत नाही.

Web Title: Soybean hazard in Umarkhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.