सोयाबीन खरेदीचे तार पुसदमध्ये

By admin | Published: June 14, 2014 08:54 PM2014-06-14T20:54:32+5:302014-06-14T23:40:45+5:30

शेतकर्‍यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रूपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापार्‍याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

Soybean purchases in Pusad | सोयाबीन खरेदीचे तार पुसदमध्ये

सोयाबीन खरेदीचे तार पुसदमध्ये

Next

मानोरा : शेतकर्‍यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रूपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापार्‍याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे. तो व्यापारी कोण, रक्कम कोणाच्या खात्यात जमा केली आणि बँकेच्या वेअर हाऊसमधून सोयाबीन पुसदला आले कसे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस तपास या सर्व बाबीवर केंद्रित झाला असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. मानोरा तालुक्यातील व्यापारी अशोक मंत्री याने ४७ शेतकर्‍यांकडून आठ हजार ४00 पोते सोयाबीन खरेदी केले होते. त्यांची रक्कम एक कोटी चार लाख रूपये आहे. हा माल बुलडाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊसमध्ये ठेवून तारण कर्ज एक कोटी २६ लाख रूपये घेऊन व्यापारी अशोक मंत्री पसार झाला होता. विशेष म्हणजे अशोक मंत्री याचा भाऊ सुरेशने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार मानोरा पोलीस ठाण्यात दिली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर शेतकर्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. आपल्या मालाचे पैसे मिळतील की नाही या विवंचनेत शेतकरी असताना काही जण त्यांना कोरडे आश्‍वासन देत होते.मात्र कोंडोली येथील शेतकरी विजय नानासाहेब देशमुख यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर मानोरा पोलीसांनी व्यापारी अशोक मंत्रीविरूद्ध गुन्हे दाखल करून अटक केली. सध्या मंत्री हा न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणातील त्याचे तीन साथीदार मात्र फरार असल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. या बहुचर्चित प्रकरणात शेतकर्‍यांची फसवणूक करून हजारो क्विंटल सोयाबीन बुलडाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊसमधून पुसद येथे आणून विकण्यात आला. या मालाची रक्कम पुसदच्या त्या व्यापार्‍याने बॅकेत जमा केली. ही रक्कम कोणाच्या बँक खात्यात जमा केली. अशा पश्न शेतकर्‍यांमधून विचारला जात आहे. मंगरूळपीर येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊसमध्ये ठेवलेले सोयाबीन पुसदला आले कसे या कामी कोणी मदत केली, यात बँकेचा अधिकारी तर गुंतला नाही ना, पुसदला हामाल कोणी विकला, हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी करणारा पुसदचा तो व्यापारी कोण, असे अनेक परत आता पुढे आले आहे. विशेष म्हणजे वेअर हाऊसमधले सोयाबीन विकण्यामध्ये अनेकजण सहभाग असण्याची शक्यता असून यामध्ये अनेक मोठ मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. 

** दिग्रसमध्येही व्यापार्‍याची फसवणूक

अशोक मंत्री या सोयाबीन खरेदीदार व्यापार्‍याने पुसद बरोबरच दिग्रसमध्येही फसवणूक केली आहे. अनेक शेतकर्‍यांजवळून सोयाबीन खरेदी केल्यानंतर तो पसार झाला होता. यात काही व्यापार्‍याचाही समावेश आहे. पैशासाठी शेतकरी गेले तेव्हा तो पसार असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे या प्रकरणात सुरूवातीला कुणीही तक्रार दाखल केल्या नव्हत्या. प्रत्येकाला पैसे बुडेल, अशी भीती होती. आता मंत्रीला पोलीसांनी अटक केली असून दिग्रसमधील शेतकर्‍याचेही पैसे मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. परंतु पैसे केव्हा मिळतील याची खाती कुणीही देऊ शकत नाही.

Web Title: Soybean purchases in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.