कोळसा तस्करांच्या टोळ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:01 AM2018-03-08T05:01:44+5:302018-03-08T05:01:44+5:30

खाणीतील ढिगा-यातून कोळसा लुटून नेण्याची जणू स्पर्धाच तस्करांच्या टोळ्यांमध्ये लागली आहे. ही ‘लूट’ सर्वच पातळ्यांवर ‘मॅनेज’ होत असल्याने टोळ्यांची संख्या वाढत आहे. या टोळ्यांच्या सदस्यांमध्ये संघर्षाची ठिणगीही पडत आहे. खाणीतून कोळसा पळविण्यासाठी शस्त्रांचाही खुलेआम वापर होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

The spark of conflicts in the coal blocks of coal smugglers | कोळसा तस्करांच्या टोळ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी

कोळसा तस्करांच्या टोळ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी

Next

वणी (यवतमाळ) - खाणीतील ढिगा-यातून कोळसा लुटून नेण्याची जणू स्पर्धाच तस्करांच्या टोळ्यांमध्ये लागली आहे. ही ‘लूट’ सर्वच पातळ्यांवर ‘मॅनेज’ होत असल्याने टोळ्यांची संख्या वाढत आहे. या टोळ्यांच्या सदस्यांमध्ये संघर्षाची ठिणगीही पडत आहे. खाणीतून कोळसा पळविण्यासाठी शस्त्रांचाही खुलेआम वापर होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
वणी तालुक्यातील मुंगोली खाणीतून कोळसा लुटण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली. या खाणीत घुग्घूस परिसरातील कोलमाफियांच्या टोळ्यांचा धुडगूस सुरू झाला. पाच वर्षांपूर्वी यातूनच या खाणीत तस्करांचे टोळीयुद्ध भडकले होते. एकमेकांना रिव्हॉल्व्हर दाखविण्यापर्यंत या सदस्यांची मजल गेली. आजही अधूनमधून असा प्रकार सुरू असतो. मात्र हा वाद पोलिसांपर्यंत येऊ न देता टोळ्यांचे म्होरके आपसातच ‘तडजोड’ करून प्रकरण मिटवित आहेत.
दोन महिन्यांपूर्वी उकणी खाणीत रात्रीच्या वेळी अनधिकृतरीत्या शिरून पिक-अप वाहनात कोळसा भरण्याचा प्रयत्न सुरू असताना या तस्करांना सुरक्षा रक्षकांनी अडविले. परंतु सुरक्षा यंत्रणेला न जुमानता शस्त्राच्या धाकावर कोळसा पळविण्याचा प्रयत्न या तस्करांनी केला. मात्र, संबंधित सुरक्षा रक्षकांच्या मदतीला रात्रपाळीतील कामगार धावून आले व त्यांनी या तस्करांना खाणीतून पिटाळून लावले. या घटनेने संतप्त झालेल्या कामगारांनी दुस-या दिवशी पहिल्या पाळीत काम बंद आंदोलनही केले होते.
राजकीय अभय असल्याने हे कोलमाफिया कुणालाही जुमानत नसल्याने वेकोलि प्रशासनालादेखील अनेकदा या कोलमाफियांपुढे नांगी टाकावी लागत आहे. काही अधिकारी जिवाच्या भीतीने कारवाई करीत नाहीत. या सर्व प्रकारात राष्टÑीय संपत्तीची मात्र अक्षरश: लूट सुरू आहे. कोलमाफियांमध्ये परप्रांतीयांचाही समावेश असून त्यांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे पाहायला मिळते.
कोळसा तस्करीमध्ये राजकीय पाठबळ असलेले किंवा थेट राजकीय पक्षाशी संबंध असलेले अनेक घटक आपले हात काळे करून घेत असल्याचेही बोलले जात आहे.

वेकोलिची सुरक्षा यंत्रणा पांगळी

तोटा सहन करावा लागत असल्याने वेकोलि प्रशासनाने खाणींमध्ये असलेली खासगी सुरक्षा यंत्रणा काढून घेतली. त्यानंतर खाणीच्या सुरक्षेची जबाबदारी खाणीत काम करणाºया कामगारांवरच सोपविण्यात आली. विशेष म्हणजे कोळसा तस्करांच्या टोळ्यांकडे घातक शस्त्रे असतात. त्याउलट वेकोलिच्या सुरक्षा यंत्रणेकडे खाणीच्या सुरक्षेसाठी कोणतीही शस्त्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे कोळसा तस्करांच्या दंडेलीपुढे वेकोलिची सुरक्षा यंत्रणा पांगळी ठरत आहे.

Web Title: The spark of conflicts in the coal blocks of coal smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.