शेतकऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:13 PM2018-02-17T22:13:37+5:302018-02-17T22:13:58+5:30

मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची ही घोषणा हवेतच विरली.

Speaking of farmers | शेतकऱ्यांची बोळवण

शेतकऱ्यांची बोळवण

Next
ठळक मुद्दे‘सीएम’चे आश्वासन हवेतच : दोन वर्षे लोटली, मदत नाही

नरेंद्र नप्ते ।
ऑनलाईन लोकमत
मुडाणा : मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची ही घोषणा हवेतच विरली. त्यात आता यंदा गारपीट आणि वादळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे.
अडीच वर्षांपूर्वी ४ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री मदन येरावार आदींनी महागाव तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. नंतर सर्वेक्षण झाले. मात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या नावाने ओरडत आहे.
यावर्षी चार दिवस महागाव तालुक्याला अवकाळी व वादळी पावसाने झोडपले. गारपिटीने तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रबीतील गहू, हरभरा, भाजीपाला पिकासह फळांचे मोठे नुकसान झाले. राजुरा, बिजुरा, वडद, कोठारी, मुडाणा, काळी टेंभी, चिल्ली, पिंपळगाव, तिवरंग आदी गावांना तडाखा बसला. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
शासनासोबतच अस्माी संकटाने शेतकरी हादरून गेले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांचे अर्थकारण बिघडले आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सरकारविरूद्ध रोष
सरकार केवळ फोटो सेशन करण्यापुरतेच मदतीची घोषणा करते. प्रत्यक्षात मदत दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरूद्ध प्रचंड रोष आहे. सरकारमध्ये वाघ असल्याचे सांगितले जाते. मात्र शेतकरी उपेक्षित असल्याची प्रतिक्रिया जगदीश नरवाडे, उपसरपंच वसंतराव राठोड, संदीप खराटे आदींनी व्यक्त केली.

पहिल्यांदा २ मार्च २०१५ रोजी गारपीट झाली. त्याचा अद्याप मोबदला मिळाला नाही. आताही मायबाप सरकारकडून कोणताच लाभ मिळण्याची शक्यता नाही. या सरकारच्या काळात नुकसान भरपाई मिळणार नाही.
- विष्णू गांवडे
शेतकरी

Web Title: Speaking of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.