पुसद तालुक्यात आंतर मशागतीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:59+5:302021-07-01T04:27:59+5:30
तालुक्यात मृग व रोहिणी नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला. त्यामुळे छोटे-मोठे नाले वाहू लागले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची ...
तालुक्यात मृग व रोहिणी नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला. त्यामुळे छोटे-मोठे नाले वाहू लागले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कपाशीची लागवड केली जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आता डवरणी, निंदणाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी रोवणीसाठी पऱ्हे टाकणे सुरु केले आहे. काही शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने पारंपरिक अवजारांसोबतच तर काही ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करीत आहे.
सध्या शाळांना सुटी असल्यामुळे विद्यार्थीही आई-वडिलांना शेतातील मशागतीच्या कामात हातभार लावत आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील काही भागात सोयाबीन, उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
बॉक्स
मजुरी वाढल्याने शेतकरी त्रस्त आहे
लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना मजुरीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. शेतीची अंतर्गत मशागतीची कामे सुरू आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीची मजुरी द्यावी लागत आहे. यामुळे शेती करणे परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहे. दुसरीकडे शेतीमालाला हमी भाव नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, हाताला काम नसल्यामुळे कसे तरी पोेट भरायचे म्हणून शेती करायची, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.