बदलीपात्रच्या याद्यांना गती

By admin | Published: April 2, 2017 12:21 AM2017-04-02T00:21:05+5:302017-04-02T00:21:05+5:30

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करण्यास गती दिली आहे.

Speed ​​of memorabilia | बदलीपात्रच्या याद्यांना गती

बदलीपात्रच्या याद्यांना गती

Next

जिल्हा परिषद : ज्येष्ठतेनुसार शोध सुरू, निर्णयात फेरबदलाची शक्यता
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करण्यास गती दिली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार याद्या तयार करण्यात येत असून सर्व नवीन पदाधिकारी पदारूढ झाल्यानंतरच यादी अंतिम होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत दरवर्षी बदलीचा हंगाम चांगलाच गाजतो. मागीलवर्षी शिक्षक बदल्यांवरून प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरूनही रणकंदन माजले होते. अनेकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यामुळे यावर्षीच्या बदली प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन पदाधिकारी, सदस्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच या बदल्या होणार आहे. शासनाने समुपदेशनाने बदली करण्यावर भर दिल्याने पदाधिकारी, सदस्यांच्या शिफारशींना आता पूर्वीसारखे महत्त्वही उरले नाही.
राज्य शासनाने शिक्षक बदल्यांच्या निर्णयात यावर्षी सुधारणा केली आहे. त्यानुसार अवघड क्षेत्र आणि हे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र, असे दोनच भाग आता राहिले आहे. मात्र नेमके अवघड क्षेत्र कोणते, ते कसे ठरविणार, पेसाअंतर्गची सर्व गावे अवघड क्षेत्रात येणार काय, आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे. यामुळे बदली निर्णयात शेवटच्या क्षणापर्यंत आणखी फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि सर्वच विभागांनी सध्याच्या शासन निर्णयानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करण्यास सुरूवात केली आहे.
सेवाज्येष्ठ शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे. त्यासाठी मुख्यालय, पंचायत समिती, केंद्र शाळा, एकाच शाळेतील ज्येष्ठता यादी बाबी विचारात घेऊन याद्या तयार केल्या जात आहे. त्यासाठी सर्वच विभागांनी खास तयारी सुरू केली आहे. मात्र शासनाकडून ऐनवेळी बदली धोरणात पुन्हा बदल होण्याची भीती सर्वच विभाग प्रमुखांना सतावत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Speed ​​of memorabilia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.