महागाव येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:28 AM2021-07-11T04:28:03+5:302021-07-11T04:28:03+5:30
महागाव : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त रक्ताचं नातं या ...
महागाव : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त रक्ताचं नातं या मोहिमेत येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस होते. त्यांनी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वनमाला राठोड, विदर्भ जनआंदोलन समिती अध्यक्ष जगदीश नरवाडे, संजय चिंतामणी, तहसीलदार नामदेव इसलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण, ठाणेदार विलास चव्हाण, महेंद्र कावळे, राजू राठोड, नंदकुमार कावळे, संजय सुरोशे, रामराव पाटील नरवाडे, डॉ. डी.एस. भेंडे, देवराव हरणे उपस्थित होते. सूत्रसंचालन लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय भगत यांनी केले. रक्तदात्यांना विजय बोंपीलवार यांच्यातर्फे व स्वप्निल कापडणीस व पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व वृक्ष भेट देण्यात आले. यवतमाळच्या शासकीय रक्तपेढीच्या डॉ. दत्ता चौरे, मोबीन डुंगे, शुभम नरवडे, सागर छत्री, रामदास आगलावे, आदर्श खडतकर, महेश मिश्रा आदींनी रक्तसंकलन केले.
यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर ठाकरे, विजय बोंपीलवार, विठ्ठलराव गावंडे, विवेक पांढरे, खुशाल खंदारे, नरेंद्र नप्ते, उत्तमराव चिंचोळकर, राजू चव्हाण, सदानंद लाहेवार, संजय नरवाडे, ऋषिकेश कदम, उत्तम गिरी, गजानन तगडपलेवार, सुनील राजवाडे, अमोल गाडबैले आदींनी सहकार्य केले.
बॉक्स
यांनी केले सहकार्य
विलास चव्हाण ठाणेदार, देवराव हरणे, प्रताप भोस, नंदकुमार कावळे, संजय चिंतामणी, संजय नरवाडे, विवेक पारडकर, विशाल पिंगाणे, अमोल राजवाडे, विशाल पांडे, नीरज वानखेडे, विशाल जाधव, आकाश सुरोशे, राहुल वानखेडे, दिगंबर नरवाडे, पवन अलट, शिवशंकर देशमुख, अनिकेत पवार, अजिंक्य बेलखेडे, शंकर चव्हाण, किरणकुमार भालेराव, अंकुश खाडे, प्रवीण गोरे, लखन लोंढे, विकास जाधव, अमरखान पठाण, सुशीलकुमार सुरोशे, ज्ञानेश्वर आडे, प्रवीण चिकणे, प्रकाश भोसले, संतोष भारती, शेख रिजवान मुस्ताक, नीलेश गोडारकर, अजित भेंडे, शुभम नावडे, समीर शेख जब्बार, शुभम राऊत, नीलेश भारती, किशोर चव्हाण, मयूर काळे, सतीश कदम, बाळू राठोड, आकाश ढोणे, विवेक शेळके, दत्ता पवार, आकाश पवार, अमोल राऊत, अनिल बोंपीलवार, विशाल कोताकोंडावार, राहुल बेलखेडे, संकेत बोंपीलवार, नितेश रामधनी, अभय बोंपीलवार, अविनाश राठोड आदींनी सहकार्य केले.